नांदेड : मुख्यमंत्र्यांची महाजानदेश यात्रा सध्या संपूर्ण राज्य पिंजून काढत आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी महाराष्ट्राचा प्रत्येक कोपरा या यात्रेद्वारे पिंजून काढण्याचे पक्ष पक्षाने समोर ठेवले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या महाजानदेश यात्रेच्या वेळी अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त ठेवलेला पाहायला मिळत आहे. अनेक संघटनेच्या नेत्यांना तसेच विरोधी पक्षातील नेत्यांना स्थानबद्ध करण्यात येते आहे.
मुख्यमंत्र्यांच्या एकूण प्रवासात सामान्य लोकांपेक्षा पक्षातील कार्यकर्त्यांचा आजूबाजूला गराडा दाखवून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याचं भासविण्याचा येते आहे. दरम्यान यावेळी इव्हेन्ट मॅनेजमेंट देखील काम करताना दिसत असून त्यात मीडिया मॅनेजमेंट आणि समाज माध्यमं मोठ्या प्रमाणावर वापरून हवनिर्मिती करण्याची जोरदार तयारी या यात्रेच्या निमित्ताने सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
मात्र या यात्रेत अनेक ठिकाणी पैसे देऊन लोकं जमवली जात असल्याचं देखील निदर्शनास येते आहे. विशेष म्हणजे हे पैसे देऊन आणलेली लोकं भाजपच्या कार्यकर्त्यांनीच जमवली असून जागोजागे ते संधी मिळताच दारूचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत. संपूर्ण प्रवासात या लोकांचा घोळक्या घोळक्याने हाच प्रकार पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या यात्रेची गाडी जरी पेट्रोलवर पुढे सरकत असली तरी कार्यकर्त्यांची गाडी देशी दारूच्या मदतीने पुढे सरकत आहे असंच म्हणावं लागेल.
