27 July 2024 10:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला
x

खडसे हेलिकॉप्टरने मुंबईच्या दिशेने जाणार | शक्तिप्रदर्शन करत होणार पक्षप्रवेश

Eknath Khadse, Reach Mumbai, By Helicopter

जळगाव, २२ ऑक्टोबर : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपचा रामराम ठोकला आहे. मागील विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळीच राष्ट्रवादीत आपण प्रवेश करणार होतो. एबी फॉर्म सुद्धा देण्यात आला होता, असा खळबळजनक खुलासा एकनाथ खडसे यांनी केला आहे. प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्याचबरोबर, इतक्या वर्षांनंतर आपण भाजप का सोडताय असा सवाल केला असता खडसेंनी मोठा खुलासा केला आहे.

‘भाजप पक्ष सोडण्याचा मी आताच निर्णय का घेतला असे विचारले जात आहे. पण, पक्ष सोडण्याचा याआधीही निर्णय घेतला होता. मागील निवडणुकीच्या वेळी मला भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यावेळीच मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार होतो. माझ्याकडे एबी फॉर्म सुद्धा तयार होता. अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांनी वेळोवेळी निरोप दिला होता. पण, त्यावेळी निर्णय घेता आला नाही, असंही खडसेंनी सांगितले.

दरम्यान, जळगावमधून एकनाथ खडसे हे मुक्ताईनगर येथून हेलिकॉप्टरने मुंबईला जाणार आहेत. त्यांच्यासोबत जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे असतील, तर खडसे समर्थक कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना झाले आहेत. तुर्तास एकनाथ खडसेंच्या सूनबाई खासदार रक्षा खडसे यांनी भाजपामध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एकनाथ खडसेंसोबत भाजपाचे काही माजी आमदारही राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी खडसे समर्थक कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना झालेत तर राष्ट्रवादीनंही कार्यक्रमाची जय्यत तयारी केली आहे.

 

News English Summary: From Jalgaon, Eknath Khadse will fly from Muktainagar to Mumbai by helicopter. He will be accompanied by District Milk Association President Mandakini Khadse, District Bank President Rohini Khadse, while pro-Khadse activists have left for Mumbai. Eknath Khadse’s daughter-in-law Raksha Khadse has decided to stay in the BJP.

News English Title: Eknath Khadse will reach Mumbai by Helicopter and activists by vehicle to join NCP News updates.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x