मुंबई : महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने राज्यात दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली होती. सदर मागणी निवडणूक आयोगाने विषयाचे गांभीर्य लक्षात मान्य केली आहे. दुष्काळी उपाययोजनांसाठी महाराष्ट्रातील आचारसंहीता शिथील करण्यात आली असल्याचे निवडणूक आयोगाने आज दुपारी जाहिर केले.

राज्यात कडक उन्हाच्या झळा बसत असून, दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी अनेक प्रकारची कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. विहिरी खणणे, पाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती, कॅनलची देखभाल इत्यादी कामे ही तीव्र उन्हाळ्यातच करावी लागतात. महाराष्ट्र सरकारने १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे.

या दुष्काळाच्या निवारणासाठी केंद्र सरकारने ४७१४ कोटी रूपये मदत जाहीर केली आहे. याचा आढावा घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची एक बैठकसुद्धा घेण्याची नितांत गरज आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठविलेल्या लेखी पत्रात म्हटले होते.

दुष्काळी उपाययोजनांसाठी निवडणूक आयोगाकडून आचारसंहीता शिथिल