1 May 2025 8:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

निश्चय झाला! पंकजा मुंडे मशाल घेऊन महाराष्ट्रभर संकल्प दौरा करणार

Pankaja Munde, Gopinathgad

परळी: मी एक मशाल घेऊन महाराष्ट्रभर दौरा करणार असून, सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेलं गोपीनाथ मुंडेंचं स्मारक बनवू नका, असंही त्यांनी सांगितलं आहे. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करा आणि चांगला सधन शेतकरी तयार करण्यासाठी योगदान द्या, असं आवाहनच त्यांनी केलं आहे. २७ जानेवारीला औरंगाबादला मी लाक्षणिक उपोषण करणार असून, मराठवाड्याच्या पाण्याच्या शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या प्रश्नावर लक्ष वेधणार असल्याचंही पंकजा मुंडेंनी बोलून दाखवलं आहे. पाच वर्षांत जे केलं त्याला पुढे नेण्यासाठी या सरकारचं योगदान महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं आहे.

गेले १२ दिवस टीव्ही लावला तर रोज संजय राऊत दिसायचे. ते जे बोलले ते करुन दाखवलं. पण मी मी काही बोलले नाही तरी माझंच नाव दिसायचं असं सांगत यावेळी त्यांनी पंकजाविषयी चांगलं नाही बोललं पाहिजे यासाठी काही लोकांना नेमलं होतं असा आरोप केला. तसंच सुत्रांची खिल्ली उडवताना, “इतके हुशार सूत्र असतील तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी कळला कसा नाही. सुत्रांचीही मर्यादा असा टोला देखील पंकजा मुंडे यांनी प्रसार माध्यमांना लगावला.

‘माझ्यावर पदासाठी दबावाचा आरोप केला जात असेल तर मी आता भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची सदस्य नाही, भाजप कोअर कमिटीच्या जबाबदारीतून चंद्रकातदादा मी मुक्ती मागत आहे,’ असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील दुख:ला वाट मोकळी करून दिली आहे.

मी कुणाकडेही काही मागणी करणार नाही, माझी कोणाकडून काही अपेक्षा नाही. काही जण म्हणतात, पंकजा मुंडे दबावाचं राजकारण खेळत आहेत, प्रदेशाध्यक्षपद, विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी दबाव आणू पाहत आहेत, पण मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, असंही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलेलं आहे.

१ डिसेंबरपूर्वी दररोज टीव्हीवर संजय राऊत दिसायचे. परंतु त्यानंतर सर्वत्र फक्त पंकजा मुंडे दिसू लागली, केवळ माझ्याबाबतची चर्चा सुरू आहे, नाथाभाऊ म्हणाले तसं आम्हाला ढकलत ढकलत दारापर्यंत आणलं, मी पक्ष सोडण्याच्या वावड्या का उठल्या? मी उत्तर देणार नाही, पक्ष उत्तर देईल, पराभवाने खचणारी मी नाही, असं म्हणत पंकजा मुंडेंनीही स्वपक्षीयांनाच घरचा आहेर दिला आहे.

गोपीनाथ मुंडे यांनी अनेकांना पक्षात मोठं केले. पण त्यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसला नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या रक्तात बेईमानी नसल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पहिल्यांदाच त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. मला भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणीही त्यांनी यावेळी भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. मी पक्ष सोडणार नाही, हवं तर पक्षाने मला सोडावं असं आव्हान भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला देत आपल्या राज्यातील दौऱ्याची घोषणा पंकजा यांनी केली.

 

Web Title:  Former Minister BJP Leader Pankaja Munde Speech on Gopinath Munde Gopinathgad

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या