12 December 2024 9:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

आज राज्यात तब्बल ८३४८ नव्या रुग्णांची भर, तर १४४ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra, Covid19, Corona Virus

मुंबई, १८ जुलै : आज राज्यात तब्बल ८३४८ नव्या रुग्णांची भर पडली. तर १४४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३,००,९३७’वर गेली आहे. तर एकूण मृत्यू ११५९६ एवढे झाले आहेत. तर मुंबईत आज ११८६ नवे रुग्ण आढळले तर ६५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या १,००,३५० एवढी झाली. तर आत्तापर्यंत ५६५० जणांचा मृत्यू झाला.

राज्यात आजपर्यंत १ लाख ६५ हजार ६६३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर आत्तापर्यंत ११ हजार ५९६ रुग्णांचा मृत्यू करोनाची लागण होऊन झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या तीन लाखांच्या टप्प्यावर आहे. यात आता चिंतेची बाब म्हणजे राज्यात बालकांना होणाऱ्या कोरोनाच्या संसर्गात वाढ झाली आहे. राज्यात १० हजार ६३९ बालकांना कोरोना झाला आहे. राज्याच्या एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण ३.७६ टक्के आहे. त्यामुळे आता चार महिन्यांनंतर ही संख्या वाढत असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

 

News English Summary: Today, 8348 new patients have been added in the state. 144 people died. As a result, the total number of patients has gone up to 3,00,937. The total number of deaths is 11596. In Mumbai, 1186 new patients were found today and 65 died.

News English Title: 8348 New Covid19 Positive Cases 144 Deaths And 5307 Discharged In Maharashtra Today Positive Cases In The State Rises To 300937 News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x