1 May 2025 4:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | मोठी बातमी, पेनी स्टॉकमध्ये दिसू शकते मोठी तेजी, महत्वाची अपडेट आली - NSE: IDEA Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
x

भाजपाच्या बैठकीत खडसे समर्थकाला बेदम मारहाण; दानवे आणि महाजनांसमोर तुफान राडा

Girish Mahajan, Raosaheb Danve

जळगाव: भाजपा जिल्हाध्यक्ष निवडीच्या बैठकीत एकनाथ खडसे समर्थक पदाधिकारी सुनील नेवे यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच हा प्रकार घडला. भाजपा जिल्हा सरचिटणीस सुनील नेवे यांना दानवे यांच्यासमोरच भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी असलेले रावसाहेब दानवे बैठकीतून निघून गेले.

या घटनेमुळे आणि सत्ता जाताच भारतीय जनता पक्षातील अतंर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. भुसावळ अध्यक्ष पदासाठी जळगावमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीत पक्षातील दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. त्यामुळे रावसाहेब दानवे व्यासपीठ सोडून निघून गेले.

भारतीय जनता पक्षाच्या भुसावळ अध्यक्षपदासाठी जळगावमध्ये शुक्रवारी बैठक बोलावण्यात आली होती. याबैठकीला पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व गिरीश महाजन हे उपस्थित होते. दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत बैठक सुरू असताना अचानक पक्षातील दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला जाऊन कार्यकर्त्यांनी एकमेकांवर शाईफेकही केली. कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी सुरू झालेली असताना रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन व्यासपीठावरच होते. वाद वाढल्यानंतर रावसाहेब दानवे बैठकीतून निघून गेले.

भुसावळात भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदाची निवड बेकायदेशीररित्या झाल्याने भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी नाराज आहेत. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचे आरोप होत आहे. भुसावळ शहराध्यक्ष निवडीसाठी ११ जण इच्छुक होते. इच्छुकांपैकी कोणाचीही निवड न झाल्याने संताप झाला आहे. यावरूनच आज जिल्हाध्यक्ष निवडीत हा वाद झाला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

 

Web Title:  Former Minister Eknath Khadse supporter functionary beaten at Jalgaon infront of BJP leader Union Minister Raosaheb Danve and Girish Mahajan.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या