मुंबई: गोरेगावमध्ये मुंबई पोलिसांनी सेक्स उघडकीस आणले आहे. रॅकेटमध्ये सहभागी असल्याप्रकरणी दोन बॉलिवूड अभिनेत्रींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. गोरेगाव पूर्व येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकला. या हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी एक बनावट ग्राहक हॉटेलमध्ये पाठवला. माहिती योग्य असल्याची खात्री होताच पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी एक ३२ वर्षीय आणि २६ वर्षीय अभिनेत्री-मॉडेलला अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

समतानगर येथील सीनिअर इन्स्पेक्टर राजूबाबू कसबे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी मध्यरात्री गोरेगाव पूर्वेतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये छापा मारला. खबऱ्याद्वारे पोलिसांना या सेक्स रॅकेटबद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांमधील एका कर्मचाऱ्याने ग्राहक बनून सेक्स रॅकेटमध्ये सामील असलेल्या तरुणीशी संपर्क केला.

पंचतारांकित हॉटेलमध्ये हे रॅकेट सुरु चालवलं जात असल्याची माहिती मिळत आहे. अमृता धनोआ आणि रिचा सिंग अशी अटक केलेल्या अभिनेत्रींची नावं आहेत. यामधील रिचा सिंग ही मॉडेल म्हणून ओळखली जाते.

 

Web Title:  High Profile sex racket Mumbai Police arrested 2 Bollywood actresses.

हायप्रोफाईल SEX रॅकेट उघडकीस; मुंबई पोलिसांकडून दोन बॉलिवूड अभिनेत्री ताब्यात