19 August 2022 4:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Atmanirbhar Bharat Failure | आत्मनिर्भर भारत फक्त मार्केटिंग घोषणा?, देशातील 15% पेक्षा जास्त आयात चीन'मधून होते आहे Lenovo Legion Y70 | लेनोवोने लीजन वाय 70 स्मार्टफोन लाँच केला, 16 जीबी रॅम आणि अनेक फीचर्स जाणून घ्या PMVVY Scheme | विवाहित जोडप्यांना दरमहा 18500 रुपये मिळण्याची गॅरंटी, 100% सुरक्षित सरकारी योजना जाणून घ्या Tatkal Passport Service | काय आहे तात्काळ पासपोर्ट सेवा, कसा करावा ऑनलाइन अर्ज, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया IRCTC Ticket Booking | रेल्वेनं लाँच केलं अ‍ॅप, रांगेत उभे न राहता स्टेशनच्या 5 किमी अंतरात तिकीट बुक करा Mutual Funds | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सोपे, पण फंडातून बाहेर कसे पडावे?, पैसे काढण्याचा मार्ग जाणून घ्या Investment Tips | या योजनेत दररोज 233 रुपये गुंतवणूक करून तुम्हाला 17 लाख रुपये परतावा मिळेल, योजनेबद्दल जाणून घ्या
x

अविनाश जाधवला आंदोलनानंतर अटक व तडीपारी आणि विनायक राऊतचा मुलगा दारू पिऊन पोलिसांना

Nilesh Rane, Shivsena, MNS Avinash Jadhav

ठाणे, ३ ऑगस्ट : मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांकडून २ वर्ष हद्दपार होण्याची नोटीस बजावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अविनाश जाधव विविध प्रश्नांवर आंदोलन करुन सरकारवर टीकास्त्र सोडत आहे. ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या मुलींना काढल्याप्रकरणी मनसेकडून शुक्रवारी ठाणे महापालिकेसमोर आंदोलन सुरु होतं. हे आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. यानंतर न्यायालयाने अविनाश जाधव यांना ३ ऑगस्टपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे आज न्यायालय कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र ठाण्यातील अधीनस्थ न्यायालयाने अविनाश जाधव यांचा जामीन फेटाळला आहे. त्यामुळे मनसेला एक प्रकारचा धक्काच असल्याचे सांगण्यात येत आहे.

अधीनस्थ न्यायालयाच्या या आदेशानूसार आम्ही आता सत्र न्यायालयात अविनाश जाधव यांना जामीन मिळण्याबाबत अर्ज दाखल केला असून 6 ऑगस्टला याबाबत सुनावणी होणार असल्याचे नितीन सरदेसाई यांनी सांगितले. दरम्यान, या सर्व प्रकरणात आता भाजप नेते निलेश राणे यांनी उडी घेतली आहे. आपल्या ट्वीटर वरून एक ट्वीट केले आहेत त्यात त्यांनी शिवसेना आणि सरकारवर शरसंधान केले आहे. या सोबतच त्यांनी सरकारला इशारा देखील दिला आहे.

राणे म्हणाले, मनसे नेता अविनाश जाधवला आंदोलन करताना अटक करण्यात आली व दोन वर्षाची तडीपारी लावली, दुसऱ्या बाजूला शिवसेना खासदार विनायक राऊत चा मुलगा दारू पिऊन पोलिसांना धमकी देतो तरी त्याच्यावर साधी तक्रार नाही. एक गोष्ट राज्य सरकारने विसरू नये… संधी सगळ्यांना मिळते.

 

News English Summary: MNS Thane district president Avinash Jadhav has been issued a two-year deportation notice by the police. For the last several days, Avinash Jadhav has been agitating on various issues and castigating the government.

News English Title: Nilesh Rane criticize Shivsena over the issue of MNS Avinash Jadhav News Latest Updates.

 

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x