27 April 2024 5:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

UPSC निकाल, प्रदीप सिंह देशात अव्वल, महाराष्ट्रातून अभिषेक सराफ पहिला

UPSC Civil Services, MPSC Exam, Banking Exams, Railway Recruitment

नवी दिल्ली, ४ ऑगस्ट : नागरी सेवा परीक्षा २०१९ चा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) जाहीर करण्यात आला झाला आहे. परीक्षेत प्रदीप सिंह याने बाजी मारली असून देशात अव्वल आला आहे. महाराष्ट्रातून अभिषेक सराफ पहिला आला आहे. तर जतिन किशोर दुसऱ्या क्रमांकावर असून प्रतिभा वर्मा तिसऱ्या आणि महिला उमेदवारांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अधिकृत यादी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. विविध नागरी सेवा परीक्षा दिलेल्या एकूण ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

यूपीएससी सिव्हिल सर्विस परीक्षेच्या मुलाखती 20 जुलैला सुरु झाल्या होत्या. या परिक्षांचा निकाल मंगळवारी सकाळी जाहीर करण्यात आला. कोरोनामुळे ही मुलाखत प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. आयएएससाठी 180, आयएफएससाठी 24, आयपीएससाठी 150, केंद्रीय सेवा ग्रुप ए साठी 438, ग्रुप बीसाठी 135 जणांची निवड करण्यात आली आहे. एकूण 829 उमेदवारांची निवड झाली आहे. यामध्ये सामान्य गटातून 304, ईडब्ल्यूएसमधून 78, ओबीसीमधून 251, एससी 129 आणि एसटी वर्गातून 67 उमेदवारांना यश मिळाले आहे.

महाराष्ट्रातील गुणवंत उमेदवारांमध्ये नेहा भोसले (१५), बीड मंदार पत्की (२२), योगेश पाटील (६३), राहुल चव्हाण (१०९), सत्यजित यादव (८०१) यांचा समावेश आहे. सत्यजित यादव मूळचा सांगली जिल्ह्यातील अहिरवाडी येथील निवासी आहे. लोकसत्ताशी बोलताना सत्यजितने परीक्षेत मिळालेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. सत्यजितने आतापर्यंत चार वेळा परीक्षा दिली होती. अखेर पाचव्या प्रयत्नात त्याला यश मिळालं आहे. आपल्या यशामागे आई, वडील आणि बहिणीचा खूप मोठा वाटा असल्याचं सत्यजित सांगतो.

 

News English Summary: The result of Civil Service Examination 2019 has been announced by the Central Public Service Commission (UPSC). Pradip Singh has won the exam and has come first in the country. Abhishek Saraf is the first to come from Maharashtra.

News English Title: UPSC Civil Services Exam 2019 Results Declared Pradeep Singh Tops News Latest Updates.

हॅशटॅग्स

#UPSC(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x