सातारा: सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील धकटवाडी गावचे सुपुत्र BSF जवान ज्ञानेश्वर चंद्रकांत जाधव यांना जम्मू आणि काश्मिर मध्ये ड्युटी बजावत असताना वीर मरण आले. त्यामुळे सातारा जिल्ह्यात एकंच शोककळा पसरली आहे. धकटवाडीत अत्यंत शोकाकुल वातावरण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

शहीद ज्ञानेश्वर जाधव हे सन २०१५ मध्ये बीएसएफमध्ये भरती झाले होते. खटाव येथून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर ते सैन्य दलात भरती झाले. गेल्या 5 वर्षांपासून ते देशसेवा करत. दोन वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते, त्यांना सहा महिन्यांचा मुलगाही आहे. वडूज पोलीस ठाण्यातून अधिकृतपणे त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. या घटनेनं जाधव कुटुंबासह गावात शोककळा पसरली आहे. तसेच, भाजपा नेते माजी खासदार उदयनराजेंनीही ट्विटर व फेसबुकवरुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

विशेष म्हणजे आठवड्यापूर्वी संदीप सावंत हे देखील देशासाठी शहीद झाल्याने शोकाकुल वातावरण क्षमत ना क्षमत तोच धकटवाडी गावचे सुपुत्र BSF जवान ज्ञानेश्वर चंद्रकांत जाधव यांना वीरमरण आल्याने संपूर्ण साताऱ्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

Web Title:  BSF Jawan Dnyaneshwar Jadhav Shahid on Indian Pakistan Border.

सातारा: महाराष्ट्राचे सुपुत्र BSF जवान ज्ञानेश्वर जाधव जम्मू-काश्मिर सीमेवर शहीद