3 May 2025 8:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

पीक कर्जमाफीचा निर्णय घाईगडबडीतला, राज्य सरकारने पुनर्विचार करावा: राजू शेट्टी

Former MP Raju Shetty

पुणे: शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली आहे. मात्र सरसकट कर्जमाफी करू म्हणणाऱ्या महाविकास आघाडीने शेतकऱ्यांची सरसकट फसवणूक केल्याची भावना आता शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

शेट्टी म्हणाले, राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीप पिकांवर काढलेलं कर्ज फेडणं शक्य नाही. सध्याच्या कर्जमाफीच्या आदेशानुसार, हा शेतकरी थकबाकीदार ठरत नाही तसेच तो हे कर्ज बँकांना परतही करु शकत नाही कारण त्याच्या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. नव्या कर्जमाफी योजनेनुसार, मागील वर्षी जो शेतकरी थकबाकीदार ठरला तोच या योनजेसाठी पात्र ठरला आहे. तर यंदा ज्यांनी कर्ज काढलं ते पात्र ठरत नाहीत. त्यामुळे या कर्जमाफीत त्रुटी आहेत.

दरम्यान, राजू शेट्टी यांना भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात जाहिर केलेल्या कर्जमाफीवर तुम्ही समाधीनी होतात का असा प्रश्न विचारला असता भाजपाने जाहिर केलेल्या कर्जमाफीवर समाधानी नव्हतो असं त्यांनी सांगितले. तसेच भाजपाने घोषणा आणि आकर्षित घोषणा केल्यामुळे महाविकासआघाडीच्या सरकारला पुन्हा नव्याने कर्जमाफी जाहिर करण्याचा निर्णय घ्यावा लागला असल्याचे राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले.

 

Web Title:  Former MP Raju Shetty said Promises given by chief minister Uddhav Thackeray have not been fulfilled.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raju Shetty(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या