3 May 2025 11:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

लॉकडाउनला विरोध नाही, पण लॉकडाउन हेच धोरण कसं काय असू शकतं?

Lockdown, Unlock, Devendra Fadnavis

मुंबई, 4 जुलै: कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याचा आता सरकारला विचार करावा लागणार आहे. अन्यथा नागरिकांना आणखी मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावं लागणार आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. आता आणखी किती दिवस लॉकडाऊन करण्यात येणार आहे, असा सवाल विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारला केला आहे. सरकारनं कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी एक कार्यपद्धती ठरवायला हवी, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

मी लॉकडाउनच्या विरोधात मुळीच नाही. मात्र आता लॉकडाउन हेच धोरण कसं काय असू शकतं? अनलॉक सुरु असताना आपण लॉकडाउन पुन्हा जाहीर केला आहे. आता लॉकडाउनमधून बाहेर पडण्याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आयसीयूचे बेड आणि व्हेंटिलेटर्स यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे. शासनाने जी खरेदी प्रक्रिया सुरु केली आहे ती वेगवान नाही. ती प्रक्रिया वेगवान करण्याची गरज आहे असाही सल्ला फडणवीस यांनी दिला आहे.

मंत्र्यांच्या गाडी खर्चाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, आता गाडी ही काय प्राथमिकता असू शकत नाही. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या बाबतीत कडक धोरण स्वीकारले पाहिजे, असं ते म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आपल्या प्रदीर्घ अनुभवातून काही सूचना करत असतील. आम्हालाही ते सूचना करायचे. मुख्यमंत्र्यांनी आता ठरवायचे आहे की सूचनांची अमलबजावणी कशी करायची आहे, असं फडणवीस म्हणाले .

भाजप कार्यकारिणीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, आम्ही कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत. कार्यकारणीत प्रत्येकाला न्याय देण्याच्या प्रयत्न केला आहे. ज्या पद्धतीची कार्यकारणी असते तशीच तयार केली आहे. काहींना केंद्रांत संधी द्यायची आहे, त्यातलं एक नाव आपल्यासमोर आहे, असं ते म्हणाले.

 

News English Summary: I am not against lockdown at all. But how can lockdown be the same strategy now? You have re-announced the lockdown when the unlock starts. Devendra Fadnavis has also said that now we have to think of getting out of the lockdown.

News English Title: How Can This Lockdown Policy Be Decided Devendra Fadnavis Questions Thackeray Government News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या