1 May 2025 11:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

पवार आणि ती FIR कॉपी | चित्रा वाघ यांच्या त्या विधानातून ते भाजपचं षडयंत्र होतं असा अर्थ?

BJP leader Chitra Wagh, Sharad Pawar

मुंबई, २७ फेब्रुवारी: पूजा चव्हाण प्रकरणामध्ये वनमंत्री संजय राठोड यांच्या अटकेसाठी आक्रमक झालेल्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने 12 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आता चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केले आहे. यासोबतच आज पवार साहेबांची खूप आठवण येत असल्याचेही त्या म्हणाल्या.

चित्रा वाघ प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, ‘5 जुलै 2016 रोजी माझ्या पतीवर आरोप झाले. त्यानंतर 7 जुलैला ईदच्या दिवशी मी शरद पवार यांना भेटायला गेले. त्यावेळी शरद पवार यांनी माझ्याकडे एफआयआरची प्रत मागितली. ही प्रत नीट वाचल्यानंतर तुझा नवरा या सगळ्यात कुठेच नाही, असे शरद पवार यांनी मला सांगितले. त्यामुळेच आज सकाळपासून मला शरद पवार साहेबांची खूप आठवण येत आहे, असे चित्रा वाघ यांनी सांगितले.

मात्र चित्र वाघ जुनी आठवण सांगताना भावनेच्या भरात चित्र वाघ जे बोलून गेल्या त्यातून त्यांचे पती किशोर वाघ यांना अडकविण्याचं तत्कालीन फडणवीस सरकारचा हात होता का अशी चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे. कारण चित्र वाघ सांगतात त्याप्रमाणे पवारांनी प्रतिक्रिया दिली होती, त्याप्रमाणे अर्थ तसाच काढता येऊ शकतो.

चित्रा वाघचा नवरा म्हणून त्यांना शिक्षा:
चित्रा वाघ पुढे बोलताना म्हणाल्या की, केवळ चित्रा वाघचा नवरा म्हणून माझ्या नवऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. लाच घेताना माझा नवरा त्या ठिकाणी नव्हता. ज्यांनी लाच घेतली त्यांची अजुनही चौकशीच सुरू आहे. मात्र माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. केवळ पूजा चव्हाण प्रकरण मी लावून धरले आहे यामुळेच आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. पण मी शांत बसणार नाही. मी बोलतच राहणार असेही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

 

News English Summary: The Bribery Prevention Department has filed a case against Chitra Wagh’s husband Kishor Wagh on February 12 for attacking Forest Minister Sanjay Rathod in the Pooja Chavan case. After this, now Chitra Wagh has taken a press conference and commented. She also said that she misses Pawar a lot today.

News English Title: I am missing to Sharad Pawar sir a lot today said Chitra Wagh news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या