11 May 2025 4:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
National Pension Scheme | पगारदारांना महिना 1000 रुपये गुंतवणुकीतून प्रति महिना 1 लाख रुपये फिक्स पेन्शन मिळणार Gratuity Money Amount | तुमचा महिना पगार किती? खाजगी कंपनी नोकरदारांना ग्रॅच्युईटीचे 1,06,731 रुपये मिळणार EPFO Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला महिना रु.7500, रु.6429, रु.5357 की रु.4286 पेन्शन मिळणार? अपडेट आली Horoscope Today | 11 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 11 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | खुशखबर! मल्टिबॅगर पेनी स्टॉक फोकसमध्ये, जोरदार तेजीचे संकेत - NSE: RPOWER NBCC Share Price | 28 टक्के कमाईची संधी मिळतेय, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC
x

महाविकासआघाडीत अंतर्गत कलह वाढलेला आहे | देवेंद्र फडणवीस यांचा टोला

Internal Strife MahaVikas Aghadi, opposition Devendra Fadnavis, Marathi News, Breaking News

मुंबई, 15 ऑगस्ट : आम्हाला सध्या राजकारणापेक्षा करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अधिक रस आहे. त्यामुळे आम्ही अशी मागणी केली आहे की, राज्यात करोनाच्या चाचण्या वाढवल्या पाहिजेत. महाविकासघाडीत अंतर्गत कलह वाढलेला आहे. त्यामुळे सरकारमध्ये काय सुरू आहे, हे कुणाच्याच लक्षात येत नाही. बदल्यासंदर्भात जे काय सुरू आहे ते अनाकलनीय अशा प्रकारचं आहे. असं विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले.

यावेळी फडणवीस यांनी पार्थ पवार, संजय राऊत, सुशांत सिंह राजपूत, बिहार निवडणुकीची जबाबदारी आदींवरून विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली. महाविकास आघाडीच्या कारभाराचे विश्लेषण करायची ही वेळ नाही. मात्र सरकारने कारभार नीट चालवावा. त्यांच्यात अंतर्गत मोठ्या प्रमाणात भांडण सुरु आहे. सरकारमध्ये नेमके काय चाललंय हे कोणालाच कळत नाही. मात्र बदल्यासंदर्भात अनाकलनीय सुरु आहे. जे ऐकायला मिळते ते भयंकर आहे. राज्याच्या डिजी यांनी चुकीच्या बदल्या करणार नाही, आता बदल्या करण्याची गरज नव्हती असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

याशिवाय, गेल्या दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना प्रसारमाध्यमांसमोर फटकारले होते. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी पार्थ पवारांचा विषय पवार कुटुंबीयांचा अंतर्गत विषय आहे. त्यात आम्हाला पडायचे नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नेमणूक झाल्याच्या मुद्द्यावरही भाष्य केले. पक्षाने मला बिहार निवडणुकीत सहाय्य करण्यास सांगितले आहे. याचा सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. महाराष्ट्र राज्य पोलिसांवर माझा विश्वास आहे. बिहार आणि मुंबई पोलिसांची तुलना होऊ शकत नाही. पोलिसांनी राजकीय दाडपणात काम करु नये. आम्ही कोणत्याही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

 

News English Summary: Two days ago, NCP president Sharad Pawar had slapped his grandson Parth Pawar in front of the media. When Devendra Fadnavis was asked about this, he said that the issue of Parth Pawar is an internal issue of Pawar family. We don’t want to fall into that, said Devendra Fadnavis.

News English Title: Internal Strife Has Escalated In MahaVikas Aghadi opposition Devendra Fadnavis News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या