16 December 2024 2:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

मुंबई पोलिसांचे थोबाड काळे झाले | फडणवीसांच्या वक्तव्यावरून पोलीस वसाहतींमध्ये संताप

Devendra Fadnavis, controversial statement, Mumbai Police, Sachin Vaze

मुंबई, १० मार्च: मुंबईतील व्यापारी मनसुख हिरेन हत्या आणि अन्वय नाईक, भाजप खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणांवरून मंगळवारी विधानसभेत रणकंदन झाले. मनसुख हिरेन यांची हत्या मुंबईचे पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनीच केल्याचा सनसनाटी आरोप विरोधी पक्षनेते देेेवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर सत्ताधारी आणि आघाडी सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप फैरी आणि घोषणाबाजीने सभागृह दणाणले. दुपारी १२ ते ४ अशा पावणेचारपर्यंत ८ वेळा आणि अखेर दुपारी ४ वाजून ५ मिनिटांनी आठव्या वेळेस दिवसभरासाठी कामकाज तहकूब झाले.

मात्र चर्चा रंगली ती एका माजी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याने मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्याची. स्वत: फडणवीस यांनी गृहमंत्री या नात्याने पोलिस दलाचे नेतृत्व केले आहे. पाच वर्षे याच पोलिसांनी त्यांना साथ दिली. प्रशासन चालविण्यात, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मदत केली. मुंबई पोलिसांचे ‘थोबाड काळे झाले’ अशाप्रकारची भाषा कसे वापरू शकतात? असा संतप्त सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.

महाराष्ट्र पोलीस दलाचे संपूर्ण जगात नाव आहे. यामागे आम्हा कोणा राजकारण्यांचे नव्हे तर पोलिसांचेच कर्तृत्व आहे. महाराष्ट्र पोलिस दलाला उज्वल परंपरा आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रावर एवढा राग का काढत आहेत हेच समजत नाही असेही अनिल देशमुख म्हणाले.

मात्र माजी गृहमंत्री राहिलेल्या फडणवीसांच्या त्या विधानाची चर्चा आता पोलीस वसाहतींमध्ये देखील होऊ लागली आहे. मागील काही दिवसांपासून फडणवीसांची प्रतिमा देखील खालावत असल्याचं पोलीस वसाहतीतील पोलीस कुटुंबीय बोलत आहेत. राजकारण्यांनी त्यांचं राजकारण करताना एखाद्या सरकारी यंत्रणांबाबत असं सरसकट मत व्यक्त करताना थोडा विचार करायला हवा असं म्हणत आहेत. देशात आज सीबीआय, ईडी सारख्या यंत्रणा भाजपच्या राजकारण आणि सूडबुद्दीमुळे आधीच बदनाम झाल्या आहेत. त्यात निष्कारण महाराष्ट्र पोलिसांना ओढू नये असं पोलीस कुटुंबीय बोलत आहेत. याच भाजपाला आम्ही पोलीस कुटुंबीयांनी सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांबद्दल गरळ ओकताना पाहिलं आहे. पोलिसांनी प्रकरण दाबलं अशी बोंबाबोंब करणारे भाजप नेते तेच प्रकरण आता सीबीआय’कडे जाऊन वर्ष झालं तरी नेमकं काय घडलं याबद्दल बोलण्यास तयार नाहीत. आमच्या पोलीस कुटुंबियांच्या कार्यक्रमात देखील यांच्या पत्नी स्वतःच्या गायकीच्या आवडी जपतात आणि इथे हे आमच्या घरातील सदस्यांना म्हणजे मुंबई पोलिसांचे ‘थोबाड काळे झाले’ अशी भाषा कशी वापरू शकतात असा संतप्त सवाल केला जातं आहे.

 

News English Summary: However, the discussion turned to a statement made by a former Chief Minister and Home Minister about the Mumbai Police. Fadnavis himself has led the police force as Home Minister. He was accompanied by the same police for five years. Helped in running the administration, maintaining law and order in the state. How can the Mumbai Police use such language as ‘Thobad has turned black’? Home Minister Anil Deshmukh has asked such an angry question to Devendra Fadnavis.

News English Title: Devendra Fadnavis controversial statement against Mumbai Police news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x