26 January 2022 10:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | काल 1 दिवसात या 10 पेनी शेअर्समधून तब्बल 10 टक्क्यांपर्यंत कमाई | यादी सेव्ह करा PPF Investment | या सरकारी योजनेत दररोज इतके पैसे जमा करून कोटीचा निधी जमा होईल | जाणून घ्या माहिती Cryptocurrency Investment | क्रिप्टोकरन्सीत गुंतवणुकीपूर्वी या गोष्टी नक्की तपासा | गुंतवणूक सुरक्षित आणि नफ्यात राहील Stock To BUY | मोठ्या नफ्यासाठी मल्टिबॅगर स्टॉक निओजेन केमिकल्स खरेदी करा | HDFC सिक्युरिटीजचा सल्ला Daily Rashi Bhavishya | 26 जानेवारी 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल 2022 Honda CBR650R | होंडा CBR650R 2022 भारतात लॉन्च | बुकिंग शुरू | वैशिष्ट्ये जाणून घ्या Gold Silver Prices Today | आज पुन्हा सोनं महागलं, पण चांदीचे दर घसरले | जाणून घ्या ताजी किंमत
x

भाजपच्या माजी मंत्र्याकडून मंदिराच्या जमिनीचा घोटाळा | लवकरच पुरावे देणार - नवाब मलिक

Nawab Malik Vs BJP

मुंबई, 12 नोव्हेंबर | अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत वक्फ बोर्डाशी संलग्नित ट्रस्ट संदर्भातील कारवाई, भाजपच्या माजी मंत्र्याचा घोटाळा आणि कंगना रणौतचं वादग्रस्त वक्तव्य, एसटी कर्मचारी संप यामुद्यावर भूमिका स्पष्ट केली. भाजपच्या एका माजी मंत्र्यानं मंदिराच्या जागेचा घोटाळा केला असून लवकरचं ते प्रकरण बाहेर (Nawab Malik Vs BJP) काढणार आहे, असं नवाब मलिक म्हणालेत.

Nawab Malik Vs BJP. Nawab Malik said that a former BJP minister had scammed the temple premises and the matter would be taken out soon :

वक्फ बोर्डच्या कार्यालयात छापे टाकण्याचं सांगण्यात आलं आहे. माझं ईडीच्या लोकांना आवाहन आहे की अफवा पसरवण्याचं काम बंद करावं. पत्रकार परिषद आणि प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करुन भूमिका स्पष्ट करावी. सत्य परिस्थिती लोकांपर्यंत पोहोचवावी. काही बातम्या प्रसिद्ध करुन तुम्ही बदनामी करु शकत नाही. आपल्या वरिष्ठांना खूश करण्याचा प्रयत्न आहे. पुण्यातील एंडोवमेंट ट्रस्टनं बनावट कागदपत्र दाखवत एमआयडीसीत जमीन घेतली होती. बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार आहे. पोलिसांचा तपास सुरु आहे. ईडीच्या एंन्ट्रीचं स्वागत आहे. वक्फ बोर्डात आम्ही क्लिनअप अभियान सुरु केलं, असं नवाब मलिक म्हणाले.

क्लिन अप अंतर्गत मंदिर, मस्जिद आणि दर्गाहच्या जमीन हडपली आहेत ते बाहेर काढणार आहे. भाजपच्या माजी मंत्र्यानं जमिनी हडप केल्या आहेत. ईश्वराच्या नावावर, अल्लाहच्या नावावर दिलेल्या जमिनी हडपण्यात आल्या. ती प्रकरणं बाहेर काढणार आहे. भाजपच्या माजी मंत्र्यानं कसे शेकडो कोटी हडपले ते बाहेर काढणार आहे. जे अधिकारी या भ्रमात आहेत की नवाब मलिक घाबरू शकतात मी त्यांना सांगू शकतो की मी या प्रकरणाच्या शेवटापर्यंत जाणार आहे, असं मलिक म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Nawab Malik Vs BJP minister had scammed the temple premises.

हॅशटॅग्स

#NawabMalik(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x