30 April 2025 6:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

जळगावमध्ये भाजपाला अजून एक दणका मिळणार? | माजी उपमहापौर राष्ट्रवादीच्या वाटेवर

Eknath Khadse

जळगाव, २६ जुलै | जळगाव शहर मनपातील भारतीय जनता पक्षाचे एक बंडखोर नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असून येत्या काही दिवसात ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या या बंडखोर नगरसेवकाचा राष्ट्रवादी प्रवेश हा विधानसभा निवडणुकीची तयारी समजला जात आहे.

जळगाव शहर विधानसभा निवडणुकीचे वारे आतापासूनच वाहू लागले असून अनेक जण इच्छुकांच्या रांगेत उभे आहेत. शहर मनपात भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना शिवसेनेने २८ नगरसेवक गळाला लावत आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. भारतीय जनता पक्षाकडून बंडखोरी करीत शिवसेनेला साथ देणाऱ्या नगरसेवकांपैकी काही नगरसेवक हे ऐनवेळी दुसऱ्या पक्षात उड्या घेण्याची किंवा पुन्हा माघारी येण्याची शक्यता आहे.

शहरातील माजी उपमहापौर तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक सुनील वामनराव खडके हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असून येत्या काही दिवसात ते एखाद्या मोठ्या नेत्याच्या उपस्थितीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. नगरसेवक पद जाऊ नये यासाठी तूर्तास ते शिवसेनेचे लेबल काढून राष्ट्रवादीचे लेबल लावतील. सुनील खडके हे घड्याळ हाती न बांधता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Jalgaon BJP leader Sunil Khadke will join NCP party soon.

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा: Click Here to Download

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या