3 May 2025 10:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

भाजपचा आमदार फुटला अन् एखाद्या मतदारसंघात पोटनिवडणुक लागली तर आश्चर्य वाटू नये

Minister Jayant Patil

पंढरपूर १६ एप्रिल: पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला होता. भाजप आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी या निवडणुकीसाठी मतदारसंघात प्रचारसभांचा धडाका लावला होता. भारतीय जनता पक्षाचे चे सरकार येईल असं खोटं देवेंद्र फडणवीस वारंवार बोलत असतात. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांना त्रास नको म्हणून आम्ही गप्प आहोत. अन्यथा भाजपचा आमदार फुटला आणि आणखी एखाद्या मतदारसंघात पोटनिवडणुक लागली तर आश्चर्य वाटून घेऊ नये असा सूचक इशारा आज (१४ एप्रिल) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला दिला आहे. मंगळवेढा मतदारसंघ पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ गेल्या दोन दिवसापासून जयंत पाटील पंढरपूरात आहेत.

भगीरथ भालकेंना असलेला जनाधार पाहता इथल्या लोकांनी निवडणुकीपूर्वीच त्यांना आमदार ठरवले आहे हे स्पष्ट दिसून येते असेही जयंत पाटील म्हणाले. “पंढरपूर – मंगळवेढा या मतदारसंघासाठी भारत नानांनी बरेच कष्ट घेतले आहेत. म्हणूनच पंढरपूर मंगळवेढ्याच्या जनतेने भल्याभल्यांना बाजूला ठेवून तीन वेळा भारत नानांना निवडून दिले. आजही तीच परिस्थिती आहे, काहींनी धनदांडग्यांना उमेदवारी दिली असली तरी लोकांनी भगीरथ भालके यांना खंबीर पाठिंबा दिला आहे”,असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

केवळ भाजप आणि राष्ट्रवादीचेच नेते नव्हेत तर शिवसेना नेते पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील काल सभेत जोरादार बॅटिंग केली. “माझ्या ३६ वर्षांच्या शिवसेनेतील राजकीय प्रवासात पहिल्यांदाच घड्याळाला मत मागायची संधी मिळाली”, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. “खा त्यांचं मटण आणि दाबा आमचं बटण”, असे आवाहन करत यावेळी शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालकेंसाठी प्रचार केला आहे.

 

News English Summary: Pandharpur Tuesday by-election campaign was in full swing. BJP and NCP leaders had staged campaign rallies in the constituency for this election. Devendra Fadnavis often tells lies that the BJP government will come. Therefore, we are silent so as not to disturb Chandrakant Patil and Devendra Fadnavis. NCP’s state president and water resources minister Jayant Patil today (April 14) warned the BJP not to be surprised if a BJP MLA split and another by-election was held in another constituency.

News English Title: Jayant Patil warned if BJP MLA may leave party and again by poll will call news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या