14 December 2024 7:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Sambhaji Bhide Meet Eknath Shinde | उदयनराजेंच्या पाठोपाठ संभाजी भिडेगुरुजी एकनाथ शिंदेंच्या भेटीला

Minister Eknath Shinde

सातारा, १८ सप्टेंबर | शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडेगुरुजी यांनी शिवसेनेचे नेते व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तांब या गावी जाऊन भेट घेतली. भाजप खासदार उदयनराजेंच्या भेटीनंतर लगेच भिडेगुरुजींनी मंत्री शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय निरीक्षकांनी भुवया उंचावल्या आहेत. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेतीची भिडेगुरुजी यांनी पहाणी केली. शिंदे यांच्या शेतात गुरुजींच्या हस्ते फणसाचे रोप लावून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

उदयनराजेंच्या पाठोपाठ संभाजी भिडेगुरुजी एकनाथ शिंदेंच्या भेटीला – Sambhaji Bhide meet minister Eknath Shinde at Satara :

राजकीय वतुर्ळात कुतूहल:
कालच भाजपाचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तराफ्याचा सुकाणू हातात घेत उदयनराजे दरे तर्फ तांब या गावी गेले होते. दोघांतील खोलीबंद चर्चेमुळे राजकीय वतुर्ळात कुतूहल निर्माण झाले आहे. संभाजी भिडे गुरुजी यांना उदयनराजे खूप मानतात. दोघांतील सख्य सर्वश्रुत आहे. या पार्श्वभुमीवर भिडेगुरुजी मंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात तर्क लढवले जात आहेत.

तर्कांना उधाण – After MP Udayanraje Bhosale Sambhaji Bhide meet minister Eknath Shinde :

खासदार उदयनराजे यांनी मराठा आरक्षण व सातारा शहरातील विविध विकासकामे याबाबत भेट घेतल्याचे सांगितले. मात्र, लगेचच दुसऱ्या दिवशी भिडेगुरुजी यांनी भेट घेतल्याने या दोन्ही भेटीमधून नक्कीच वेगळे काय तरी घडणार याची चर्चा आता सुरू झाली आहे. भिडेगुरुजी यांना भेटीबाबत विचारले असता त्यांनी भेटीचे कारण स्पष्ट केले नाही. मात्र, एका तासाहून अधिक काळ चाललेल्या खोलीबंद चर्चेमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधान आले आहे. मात्र मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Sambhaji Bhide meet minister Eknath Shinde at Satara.

हॅशटॅग्स

#EknathShinde(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x