11 May 2025 11:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BPCL Share Price | होय! तब्बल 44 टक्के परतावा देईल हा सरकारी कंपनीचा शेअर, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: BPCL National Pension Scheme | पगारदारांना महिना 1000 रुपये गुंतवणुकीतून प्रति महिना 1 लाख रुपये फिक्स पेन्शन मिळणार Gratuity Money Amount | तुमचा महिना पगार किती? खाजगी कंपनी नोकरदारांना ग्रॅच्युईटीचे 1,06,731 रुपये मिळणार EPFO Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला महिना रु.7500, रु.6429, रु.5357 की रु.4286 पेन्शन मिळणार? अपडेट आली Horoscope Today | 11 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 11 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | खुशखबर! मल्टिबॅगर पेनी स्टॉक फोकसमध्ये, जोरदार तेजीचे संकेत - NSE: RPOWER
x

व्यंगचित्रकार जुलमी राजवट उलथवून लावू शकतो : राज ठाकरे

Raj Thackeray, MNS

मुंबई : जागतिक स्तरावर आज व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा केला जात आहे. व्यंगचित्रातून विरोधकांचा समाचार घेणारं परिचित राजकीय व्यक्तिमत्व असलेले राज ठाकरे यांनी आपल्या खास ठाकरे शैलीत व्यंगचित्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात भावना व्यक्त करताना, व्यंगचित्रकारात एखादी जुलमी राजवट उलथवून लावण्याची क्षमता असते अशी प्रतिक्रिया व्यक्त करत विद्यमान सरकारला टोला लगावला आहे.

राज यांनी ट्विटरवरून शुभेच्छा देताना म्हंटले, व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यात इतकी ताकद असते की एखादी जुलमी राजवट उलथवली जाऊ शकते. आज जागतिक व्यंगचित्रकार दिन आहे. ह्या निमित्ताने देशभरातील माझ्या व्यंगचित्रकार सहकाऱ्यांना शुभेच्छा तर आहेतच पण तुमच्या प्रतिभेची देशाला आज सगळ्यात जास्त गरज आहे हे मात्र विसरू नका.

राज ठाकरेंचा व्यक्तीमत्व जरी राजकीय असले, तरी त्यांनी आपल्या व्यंगचित्रातून अनेकांवर राजकीय आसूड ओढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा राज ठाकरेंनी अनेकवेळा व्यंगचित्राच्या माध्यमातून समाचार घेतला आहे. भाजपाला त्यांची व्यंगचित्रं इतकी झोंबत होती की त्यांना सुद्धा प्रतिऊत्तर देण्यासाठी स्वतःचे व्यंगचित्रकार नेमावे लागले जे राज ठाकरे यांच्यासमोर फिके पडले होते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या