3 May 2025 7:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

महाराष्ट्रात ३८२७ नवे कोरोना रुग्ण, १४२ जणांचा मृत्यू

Maharashtra, Covid 19, Corona Virus

मुंबई १९ जून : महाराष्ट्रात आज ३८२७ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये १४२ रुग्णांचा करोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे. तर मागील २४ तासांमध्ये १९३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्याच्या घडीला ५५ हजार ६५१ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत तर ६२ हजार ७७३ करोनाबाधित रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत. मागील चोवीस तासांतील आकडेवारीनंतर महाराष्ट्रातली करोनाग्रस्तांची एकूण संख्या ही १ लाख २४ हजार ३३१ इतकी झाली आहे.

सध्याच्या घडीला राज्यात ५ लाख ९१ हजार ४९ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर २५ हजार ६९७ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात मागील २४ तासांमध्ये १४२ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण मृत्यूंची संख्या ५ हजार ८९३ इतकी झाली आहे.

तत्पूर्वी, मुंबईच्या धर्तीवर राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टरांना टास्क फोर्सची नेमणुक करा, असे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज जिल्हाधिका-यांना दिले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त यांच्याकडून कोरोना परिस्थितीचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील सहभागी झाले होते.

 

News English Summary: In Maharashtra, 3827 new corona patients have tested positive today. In the last 24 hours, 142 patients have died due to coronary heart disease. In the last 24 hours, 1935 patients have been discharged. At present, 55,651 patients are active in the state, while 62,773 patients have recovered and gone home.

News English Title: Maharashtra 3827 new corona patients have tested positive today News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या