मुंबई, ०८ जुलै | देशात असो किंवा राज्यात, भारतीय जनता पक्षाचं राजकारण २०१४ नंतर पूर्णपणे बदललं असून त्यात मूळ भाजप पदाधिकारी आणि नेते मंडळींच्या राजकारणाला अहोटी लागल्यात जमा आहे. त्यात फडणवीसांनी देखील देशातील मोदी नीतीप्रमाणे राज्यातही फडणवीस नीती सुरु करून केवळ निवडून येण्याच्या निकषावर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी ते मनसेतील नेते मंडळींना प्राधान्य दिल्याचं वारंवार पाहायला मिळालंय. त्यातही या पक्षातील नेत्याचा पराभव झाल्यास त्यांना पुन्हा विधान परिषद किंवा राज्यसभेवर पाठवून मोदी पद बहाल करण्याचा फडणवीसांनी सपाटाच लावला आहे.
कालच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील राज्यातील चेहऱ्यांचा विचार करता त्यांचा RSS’शी काडीचाही संबंध नाही आणि त्यामुळे हे चेहरे मंत्रिमंडळात दिसण्यामागे देखील फडणवीस आहेत यात अजितबत शंका नाही. परिणामी त्यांनी आयात नेत्यांना प्राधान्य देताना मूळ भाजप नेत्यांकडे पूर्णपणे डोळेझाक केल्याचं पाहायला मिळतंय. कालच्या चेहऱ्यांमध्ये देखील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील माजी आयात नेत्यांना प्राधान्य दिलं आहे. मात्र यामुळे मूळ भाजप नेत्यांचा राजकारणाला भविष्यात पूर्णविराम मिळून आयात नेतेच राज्य भाजप चालवतील असं म्हटलं जातंय.
भारती पवार ह्या दिंडोशीच्या खासदार. लोकसभा निवडणुकीच्या आधी त्या राष्ट्रवादीतून भाजपात दाखल झाल्या. तर कपिल पाटील हे भिवंडीचे खासदार. तेही राष्ट्रवादीतून भाजपात आले. 2014 ला त्यांचा भाजपा प्रवेश झाला. कपिल पाटील हे ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. नंतर ते भाजपात आले. भिवंडी लोकसभेचं तिकिट मिळालं. निवडुण आले. भारती पवार ह्याही राष्ट्रवादीत होत्या. त्यांनीही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात उडी घेतली आणि अवघ्या दोन वर्षात खासदार, मंत्रीही झाल्या.
नारायण राणेंनी शिवसेना सोडली ती मंत्रीपदाच्या मुद्यावर. नंतर काँग्रेस सोडली तीही मुख्यमंत्रीपदाच्याच मुद्यावर. आता जर भाजपानं मंत्री केलं नसतं तर राणे पक्षातच राहीले असते का अशीही चर्चा रंगलीय. शिवसेनेचे नेते त्यावर बोटही ठेवतायत. कपिल पाटील, भारती पवार यांच्याबद्दल मात्र तशी चर्चा नाही. पण पक्षातल्या इतर निष्ठावंत ओबीसी नेत्यांना डावलून या दोन्हींना संधी दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Maharashtra BJP giving more opportunities to leaders with non BJP party origin news updates.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		