21 October 2019 4:18 PM
अँप डाउनलोड

१० वी चा यशाचा टक्का घसरला, फक्त ७७.१० टक्के विद्यार्थी पास

10th result, maharashtra state board

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे २०१९ मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ७७.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परंतु गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी निकालाचा टक्का कमालीचा घसरला आहे. मागील वर्षी म्हणजे २०१८ मध्ये दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यशाचा निकाल ८९.४१ टक्के होता. गतवर्षीच्या तुलनेत यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या १२.३१ टक्क्यांनी कमी झाली आहे.

नेहमीप्रमाणे सध्याही मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ८८.३८ टक्के तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी ६७.२७ टक्के लागला आहे. यंदा १६ लाख १८ हजार ६०२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती, त्यापैकी १२ लाख ४७ हजार ९०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

निकालाची विभागनिहाय टक्केवारी खालीलप्रमाणे:
पुणे : ८२.४८
नागपूर: ६७.२७
कोकण : ८८.३८
औरंगाबाद : ७५.२०
मुंबई – ७७.०४
कोल्हापूर – ८६.५८
अमरावती – ७१.९८
नाशिक – ७७.५८
लातूर – ७२.८७

हॅशटॅग्स

#10thResult(1)#MaharashtraStateBoard(1)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या