3 May 2025 3:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

लागा तयारीला, महाविकास आघाडी सरकारचा १० हजार पोलीस शिपाई भरतीचा निर्णय

Maharashtra government, Police Bharti, MPSC, UPSC

मुंबई, ७ जुलै : अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईबाबत एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

कोरोनाबाधितांच्या संख्येत आता मुंबईने चीनलाही मागे टाकल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. चीनमध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या 85 हजार 320 इतकी आहे, तर मुंबईत ही संख्या आता 85 हजार 724 वर पोहोचली आहे. तर चीनमध्ये 4 हजार 648 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला असून मुंबईमध्ये ही संख्या 4938 इतकी आहे.

दुसरीकडे राज्याची आर्थिकस्थिती बिकट असली तरी सरकारने धाडसी निर्णय घेत राज्यातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी पोलीस शिपाई संवर्गात दहा हजार जणांची भरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे कोरोनाच्या काळात शहरी आणि ग्रामीण तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे.

याशिवाय नागपूरमधील काटोल येथे राज्य राखीव पोलिस दलाच्या महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील महत्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, महसुल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. श्रीनिवास, एसआरपीएफच्या अपर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत गृह विभागाकडून पोलीस शिपाई पदाच्या 8 हजार जागा भरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात आणखी 2 हजार जागा वाढवून एकूण 10 हजार पोलीस शिपाई भरती करण्याचे आणि ही भरती प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर ही भरती प्रक्रिया विनाअडथळा यशस्वीपणे कशी राबवता येईल, याचा विचार करुन सर्वंकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने मांडण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

 

News English Summary: The Mahavikas Aghadi government has decided to recruit 10,000 personnel in the police force to reduce the workload on the police force in the state.

News English Title: Maharashtra government will recruit 10000 employees in police force News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या