2 May 2025 11:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

ग्रामपंचायत निवडणुकीत ना पक्षाच्या चिन्हाचा संबंध असतो, ना पक्षाचा, ना नेत्याचा​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​ | जनतेला प्रभावित करण्यासाठी ठराविक माध्यमांचा खेळ?

Gram Panchayat Election 2022

Gram Panchayat 2022 | राज्य निवडणूक आयोगाने 16 जिल्ह्यांमधील 608 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर केल्या होत्या. यातील 51 ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध पार पडल्या होत्या. तर 547 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान पार पडले होते. यासाठी 66.10 टक्के मतदान पार पडले होते. सोबतच सरपंचपदाच्याही थेट जनतेतून निवडणुका पार पडल्या होत्या. मागील काही काळात घडलेल्या राजकीय घडामोडी, शिवसेनेतील फुट आणि सत्तांतरानंतर होत असलेल्या या निवडणुकांच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागले होते.

दरम्यान, आज सकाळपासून हे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाल्यापासून ठराविक माध्यमं ज्याप्रमारे वृत्तांकनाची लाईव्ह कॉमेंट्री लावून बसले आहेत आणि त्यामार्फत जी पक्षनिहाय आकडेवारी जाहीर करण्यात येतं आहे ते पाहून मराठी प्रसार माध्यमं सुद्धा ‘गोदी मीडिया’ प्रमाणे स्क्रिप्टेड वृत्तांकन करून राज्यातील जनतेला प्रभावित करण्यासाठी झटत असावीत अशी चर्चा आता पत्रकारांमध्ये सुरु झाली आहे. महापालिका, विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत जसं खात्रीने पक्षीय आकडेवारी सांगता येते आणि त्याला कारण असतं या निवडणुका पक्ष चिन्हं, पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि पक्षाच्या नेत्यांनी केलेला जाहीर प्रचार हे त्याला कारण असतं.

मात्र ग्राम पंचायत निवडणुकीत असा कोणत्याही गोष्टींचा संबंध नसतो. म्हणजे ग्राम पंचायत निवडणुकीत कोणत्याही पक्षाचे अधिकृत उमेदवार, कोणत्याही पक्षाचं चिन्ह किंवा कोणत्याही पक्षाचे प्रमुख याच्याशी कोणताही संबध नसतो. गाव-पातळीवरील काही लोकांचे गट एकत्र येऊन पॅनल बनवतात आणि त्यांना निवडणूक आयोगाने दिलेल्या निरनिरळ्या चिन्हांवर वेगवेगळे गट ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून उभे राहतात. तसेच गावपातळीवर उभ्या राहणाऱ्या एकाच पॅनलमधील सर्व सदस्य निवडून येतातच असं सुद्धा नाही. मग प्रसार माध्यम थेट पक्षीय आकडेवारी जाहीर करतात हे हास्यास्पद म्हणावं लागेल.

कारण, गावातील मतदाराने दाबलेलं बटन हे भाजप, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी, काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्ष चिन्हांशी संबंधित नसते. मग राजकीय पक्षांची आकडेवारी प्रसार माध्यमं कशी काय जाहीर करतात. म्हणजे मतदाराने ग्रामपंचायत निवडणुकीत या कोणत्याही पक्ष चिन्हाचे बटन दाबलेले नसते, म्हणजे त्याचा काही संबंधच नसतो, मग प्रसार माध्यमं ‘जनतेचा भाजप, शिंदे गटाला, राष्ट्रवादीला, काँग्रेसला किंवा शिवसेनेला कौल’ असं कसं जाहीर करतात?. अगदी विजयी झालेल्या एकाच पॅनलमध्ये अनेक पक्षाचे कार्यकर्ते गुलाल उधळून नाचत असतात. आत एकाच स्थानिक विजयी पॅनलमध्ये सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते गुलाल उधळून नाचत असतील तर नेमका विजय कोणत्या पक्षाचा झालं हे कसं समजतं?

वास्तविक, ग्रामपंचायत निवडून येणारे सदस्य गावातील समस्या घेऊन विविध पक्षांकडे जातात आणि त्या समस्या दूर करण्यासाठी कोण मदत करेल यावर विविध राजकीय पक्षांसोबत चर्चा-बैठक सुरु होतात. त्यानंतर त्यांना पुरस्कृत असं म्हटलं जातं, मात्र हे चित्र स्पष्ट होण्यासाठी २-३ दिवस लागतात. पण प्रसार माध्यम ज्या प्रकारे राज्यातील जनतेवर एका विशिष्ट पक्षाचा प्रभाव पाडून विरोधी पक्षातील दुसऱ्या पक्षाला द्वितीय क्रमांकावर ठेवून त्याचा थेट संबंध उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी ठेवून ज्या प्रकारे वृत्त देत आहेत ते अत्यंत भीषण म्हणावं लागेल. संध्याकाळचे ५ वाजताच भाजपचे दिल्ली ते गल्लीतील नेते क्रमांक एकाच्या ट्विट सिरीज करू लागले आहेत, त्यावरून ठराविक माध्यमांना नेमका कोणता टास्क देण्यात होता हे स्पष्ट होतंय. मात्र इतकं होऊनही शेवटच्या क्षणी महाविकास आघाडीला जास्त जागा दाखविण्याची वेळ आल्याने अखेर सत्ताधाऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पासून मधीच नंबर वन सांगण्यासाठी धावाधाव केल्याचं पाहायला मिळालं.. असो, पण गाव असेल की शहर, जनतेने अशा खेळापासून सावध राहणं गरजेचं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra Gram Panchayat Election 2022 check details 19 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gram Panchayat Election 2022(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या