4 May 2025 12:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

राज्यात ६ हजार ६०३ नवे कोरोना रुग्ण, १९८ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra, Corona Virus, Covid 19

मुंबई, ८ जुलै : आज दिवसभरात राज्यात ६ हजार ६०३ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. तर, १९८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. याचबरोबर राज्यातील करोनाबाधितांची संख्या आता २ लाख २३ हजार ७२४ वर पोहचली आहे.

राज्यातील एकूण २ लाख २३ हजार ७२४ करोनाबाधितांमध्ये, आतापर्यंत करोनावर मात केलेल्या १ लाख २३ हजार १९२ जणांचा व करोनामुळे मृत्यू झालेल्या ९ हजार ४४८ जणांचा समावेश आहे. तर आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमुळे राज्यात ८९ हजार २९४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

दरम्यान, राज्यात आता कोरोना लक्षणविरहीत नागरिकांचीही टेस्ट केली जाणार आहे, अशा माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील नागरिकांच्या जास्तीत जास्त टेस्ट कराव्यात, अशा सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहे. त्यामुळे आता प्रिस्क्रीपशन शिवाय देखील कोरोना टेस्ट केल्या जाणार आहेत, असंही आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, कोरोनावर लवकरच औषध सापडलं नाही तर भारतात भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते. फेब्रुवारी २०२१ पासून भारतात दररोज २.८७ लाखांच्या जवळपास नवे रुग्ण आढळून येऊ शकतात असा रिपोर्ट जगविख्यात MIT (Massachusetts Institute of Technology)ने दिला आहे.

 

News English Summary: Maharashtra reported 6,603 new COVID-19 cases and 198 deaths today, taking the total number of cases to 2,23,724 including 1,23,192 recoveries and 9,448 deaths. Number of active cases stands at 91,065 said State Health Department.

News English Title: Maharashtra Reported 6603 New Covid 19 Cases And 198 Deaths Today News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या