19 July 2019 9:57 AM
अँप डाउनलोड

मी विधानसभा निवडणूक लढणार, हाकाळपट्टीनंतरही आशा बुचकेंचा ठाम निर्धार

मी विधानसभा निवडणूक लढणार, हाकाळपट्टीनंतरही आशा बुचकेंचा ठाम निर्धार

लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्यामुळे शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पुण्यातील शिरूर लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या आढळराव पाटलांचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे विजयी झाले. लोकसभा निवडणुकीत आशा बुचकेंनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळेच आढळराव पाटलांचा पराभव झाला असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.

आशा बुचकेंच्या निलंबनाच्या कारवाईवर मात्र बुचके समर्थक शिवसैनिक खूप नाराज आहेत, तसेच त्यांच्यासाठी हा मोठा मानसिक धक्का मानला जात आहे. पक्ष वरिष्ठांकडून झालेली हि कार्यवाही एकतर्फी असल्याचे त्यांचे मत आहे. काही महिन्यांपूर्वी मनसेतून शिवसेनेत आलेले जुन्नरचे आमदार शरद सोनावणे हेच २०१९ च्या विधानसभेत जुन्नर मधून शिवसेनेचे उमेदवार आहेत हे जवळजवळ निश्चित झाले आहे. बुचके यांच्या हाकलपट्टीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला असून याबाबत आपल्याला काहीच माहीती नाही, अशी प्रतिक्रिया तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी व्यक्त केली.

मीना खोऱ्यातील व नारायणगाव परिसरातील बुचके समर्थक शिवसैनिकांनी या कारवाईचा निषेध केला आहे. वास्तविक आमदार सोनवणे यांच्याकडे निवडणूक प्रचाराची सूत्र होती, यामुळे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पराभवाला बुचके यांनाच जबाबदार धरणे योग्य नाही असे त्यांचे मत आहे.जुन्नर तालुक्‍यात आढळराव पाटील यांना अपेक्षित मतदान झाले नाही आणि याला आमदार सोनवणे सुद्धा जबाबदार आहेत, अशी भावना बुचके समर्थक व्यक्त करत आहेत. हकालपट्टीची कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी बुचके समर्थकांनी केली आहे.

माझ्यावर पक्षातून निलंबनाची कारवाही झाली असली तरी मी विधानसभा निवडणूक लढविण्यास सज्ज आहे. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची निष्ठावंत शिवसैनिक आहे आणि मी रणांगणातून माघार घेणार नाही. माझ्या राजकीय भवितव्याचा निर्णय माझे समर्थक शिवसैनिकच घेतील. आशा बुचकेंच्या ह्या वक्तव्यामुळे त्या कोणत्या पक्षातून निवडणूक लढविणार कि अपक्ष लढणार या बाबत कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच संभ्रम निर्माण झाला आहे.

जर आशा बुचके विद्यमान आमदार शरद सोनावणे यांच्या विरुद्ध विधानसभेला उभ्या राहिल्या तर आमदार शरद सोनावणेंना हि निवडणूक नक्कीच जड जाईल. कारण मनसेमधून शिवसेनेत आल्यानंतर आमदार शरद सोनावणेंविरोधात जुन्नर तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये चांगलीच नाराजी होती. जर हे नाराज शिवसैनिक आशा बुचकेंकडे वळले तर आमदार शरद सोनावणेंना हि निवडणूक नक्कीच जड जाईल.

इथे लग्न जमते - मराठी विवाह

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या