सांगली-कोल्हापूर पूर | २ दिवस पुराच्या पाण्यात असाल तरच मोफत अन्नधान्य | फडणवीस सरकारचा तो GR

सांगली, २० ऑक्टोबर : सत्ताधारी सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात सध्या राज्यात पावसाने केलेल्या नुकसानीवरून वाद सुरू आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सध्या उस्मानाबाद येथे दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. देवेंद्र फडणवीस आज (२० ऑक्टोबर) उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला
“राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी. सरकारने मदतीबाबत आता कुठलेच बहाणे सांगू नये. मला आश्चर्य वाटतं, या तीन पक्षांमध्ये खूप मतभेद आहेत. पण एका बाबतीत सगळे मात्र एका सूरात बोलतात की, केंद्राने मदत करावी. त्यामुळे हात झटकण्यात तीनही पक्ष तरबेज आहेत”, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.यावेळी त्यांनी राज्य सरकावर निशाणा साधला.
मात्र फडणवीस सरकारच्या काळात सांगली-कोल्हापूर पूरस्थिती निर्माण झालेली असताना लोकांच्या मदतीसाठी करण्यात आलेला GR सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होतं असून त्यातील अटींबाबत राष्ट्रवादीने देखील त्यावेळी ट्विट केलं होतं. ऑगस्ट २०१९ मध्ये महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे राज्यात पुरस्थिती निर्माण झाली होती. त्यात सागंली आणि कोल्हापूरला या पुराचा सर्वात अधिक फटका बसलेला होता. अशातच अन्न व नागरी पुरवठा विभागाने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ७ ऑगस्ट रोजी एक शासन निर्णय काढला होता. मात्र त्या शासन निर्णयाचे निकष पुरग्रस्तांची थट्टा करणारे होते. तो शासन निर्णय समोर आल्यानंतर आता त्यावर चौफेर टीका करण्यात आली होती.
सरसकट सर्वांना मदत करणं अपेक्षित असताना असे जीआर का काढले जात आहेत, असा प्रश्नही त्यावेळी जयंत पाटलांनी विचारला होता. पूरग्रस्तांची सरकारनं थट्टा करू नये अशी आमची अपेक्षा आहे. दोन दिवस जमीन पाण्याखाली राहिल्यास शेतकऱ्यांना पुन्हा नव्यानं शेती करावी लागणार आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला सरकारनं वाऱ्यावर सोडलं आहे. लोकांना मदतीचा हात देण्याऐवजी मंत्री सेल्फी काढत फिरत असल्याचं पाहिल्यानंतर मन उद्विग्न होत असल्याची भावनाही जयंत पाटलांनी त्यावेळी व्यक्त केली होती.
ज्या पद्धतीने सरकारकडून मदत मिळायला हवी तशी अजूनही मिळत नाही. स्थानिक सांगली जिल्ह्यातील माझे नागरिक प्रयत्नांची शर्थ करुन माणसांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे या सरकारची अनास्था आता सांगली आणि कोल्हापूरकरांच्या समोर आली आहे.#maharashtrafloods .@NCPspeaks
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) August 9, 2019
त्यावेळी फडणवीस सरकारकडून पुरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला होता. मात्र ती मदत करताना पूरग्रस्तांची थट्टाच जास्त करण्यात आली होती. दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस क्षेत्र पाण्यात बुडालं असेल तरच मोफत अन्नधान्य (१० किलो गहू आणि १० किलो तांदूळ) दिलं जाणार होतं. तसा जीआरच राज्य सरकारकडून काढण्यात आला होता. सरकारच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने ७ ऑगस्ट रोजी हा जीआर काढला होता.
News English Summary: At that time, the Fadnavis government had extended a helping hand to the flood victims. However, the flood victims were mocked while helping her. Free food grains (10 kg wheat and 10 kg rice) would be provided only if the area was submerged for more than two days. As such, the GR was removed by the state government. The GR was issued on August 7 by the government’s Food and Civil Supplies Department.
News English Title: Sangali Kolhapur flood relief old GR of Fadnavis government gone viral News Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC