27 June 2022 3:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Investment Tips | दर महिन्याला गुंतवा 1302 रुपये | मॅच्युरिटीवर मिळतील 28 लाख | योजनेबद्दल जाणून घ्या Poco F4 5G | पोको F4 5G स्मार्टफोन सेल | 4000 रुपयांची सूट आणि फ्री हॉटस्टार, डिस्ने आणि यूट्यूब प्रीमियम New Labour Code | कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 4 दिवस काम, 3 दिवस विश्रांती | 1 जुलैपासून नियमांची अंमलबजावणी होणार? Maharashtra Political Crisis | महाविकास आघाडी सरकार अल्पमतात | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष Maharashtra Political Crisis | सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास भाजपाचा पॉलिटिकल प्लॅन तयार Zomato Share Price | झोमॅटोच्या शेअरमध्ये गुंतवणूक करा | 100 टक्के मल्टिबॅगर रिटर्न कमाई होईल नवाब मलिक मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी नव्हते | संजय दत्त होता | भाजपच्या स्क्रिप्टवर शिंदेंच्या जनतेला टोप्या
x

भाजप-सेनेच्या सरकारमुळे गिरगांवकर रस्त्यावर: मेट्रो-रेल्वे प्रकल्प

गिरगाव : मुंबईतील मेट्रो रेल्वेचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरु असून त्याला सुरवातीला गिरगावकरांचे सहकार्य लाभले होते. कारण या मार्गातील केवळ २ इमारती पाडाव्या लागतील असं आधी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून सांगण्यात आलं होत. परंतु भाजप-सेनेच्या सरकारने अक्षरशः त्या विषयावर यू-टर्न घेतल्याचे चित्र समोर आले आहे.

कारण मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून २ इमारती नाही तर तब्बल ४० इमारती भुईसपाट केल्या जाणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्थानिक गिरगावकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भाजप-शिवसनेच्या सरकारने आम्हाला विस्थापित करण्यापेक्षा आमच्या कुटुंबाला स्वेच्छामरण द्यावे अशी मागणी त्यांनी भाजप – शिवसेनेच्या युती सरकारकडे केली आहे.

भाजप शिवसेनेच्या युती सरकारने म्हणजे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून मागील ८ दिवसात गिरगावच्या तब्बल ४० इमारतींमधील रहिवाशांना त्यांच्या राहत्या इमारती रिकाम्या करण्याच्या नोटीस मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून धाडण्यात आल्या आहेत. त्या नोटीस मिळाल्यापासून सर्वच रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लवकरच आपण राहत असलेल्या इमारती तुटणार या धास्तीनेच गिरगावकर सुन्न झाले आहेत.

भाजप शिवसनेच्या युती सरकारकडून कोणताही दिलासा न मिळाल्याने अखेर गिरगावकरांनी रविवारी ‘आम्ही गिरगावकर’ या व्यासपीठाच्या माध्यमातून आंदोलन करत स्थानिकांनी थेट स्वेच्छामरणाची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. आमचं आणि आमच्या कुटुंबाचं नेमकं भवितव्य काय याचा आम्हाला अंदाज येत नसल्याची भावना आम्ही गिरगावकरचे सचिव मिलिंद वेदपाठक यांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे या स्थानिकांना भेटच देत नाहीत अशी खंत बोलून दाखविली आहे.

गिरगावातील सूर्यमहल, तारामहल, धूतपापेश्वर, क्रांतीनगर या परिसरातील नागरिकांना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून या नोटीस बजावण्यात आल्या असून त्यात तब्बल १०३ कुटुंबांचा समावेश आहे. गिरगावातील सूर्यमहल व तारामहलमधील नागरिकांना पिंपळवाडी येथे म्हाडाच्या कॉलनीत पर्यायी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु हेच उत्तर इतर ४० इमारतींमधील नागरिकांनाही देण्यात येत असल्याने स्थानिक नागरिकांच्या आणि कुटुंबियांच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

एकीकडे शिवसेना निवडणूक आल्या की लगेच मराठीच अस्त्र बाहेर काढून गिरणगावात मतांचा जोगवा मागताना दिसते. परंतु आज त्यांच्याच राजवटीत म्हणजे दिल्लीत, राज्यात आणि महानगर पालिकेत सत्तेत असताना सुद्धा गिरगाव मधील मराठी माणसाला बेघर होण्याची वेळ आली आहे अशी खंत स्थानिक मराठी माणूस बोलून दाखवत आहे. कारण शिवसेना अशा विषयात केवळ निषेध करते, पण निर्णय काहीच हाती लागत नसल्याने स्थानिक संतप्त आहेत. त्यामुळे भाजप बरोबर शिवसेनेला सुद्धा येत्या निवडणुकीत गिरगावातील नागरिकांच्या रोषाला सामोरे जाऊ लागेल.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x