25 September 2020 10:09 PM
अँप डाउनलोड

उत्तर भारतीय मतांसाठी योगी आदित्यनाथ नालासोपाऱ्यात: पालघर

पालघर : एकूणच महाराष्ट्रातील बऱ्याच मतदारसंघात उत्तर भारतीय मतदार विचारात न घेणे ही राजकीय कमजोरी आहे. मनसे वगळता सर्वच पक्ष उत्तर भारतीय मतांच्या पहिल्यांदा विचार करताना दिसत आहेत. त्याचाच प्रत्यय म्हणजे येत्या २३ तारखेला म्हणजे बुधवारी वसई, विरार आणि नालासोपारा भागातील उत्तर भारतीय मतदारांची लोकसंख्या लक्ष्यात घेता भाजपने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने नालासोपारा येथे जाहीर सभेचे आयोजन केलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

विशेष म्हणजे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सुद्धा पालघर मध्ये त्याच दिवशी जाहीर सभा होत आहे. नालासोपारा भागात उत्तर भारतीय मतदार मोठ्या प्रमाणावर असल्याने भाजपनं उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांना पाचारण केलं असल्याचं राजकीय विश्लेषक बोलतात.

काल देवेंद्र फडणवीस यांनी नालासोपाऱ्यातील सभेत शिवसेना तसेच बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याच मुख्यमंत्र्यांच्या सभेला उत्तर भारतीय मतदारांची मत लक्षात घेता, भाजपचे उत्तर प्रदेशचे खासदार व अभिनेते मनोज तिवारी यांना पाचारण करण्यात आलं होत.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Shivsena(921)BJP(421)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x