22 September 2019 1:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

संदीप देशपांडेंनी 'ईडी'यट हिटलर' शीर्षक असलेले टी-शर्ट परिधान केले होते

MNS, Sandeep Deshpande, Raj Thackeray

मुंबई : कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे हे आज सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सामोरे जात आहेत. या कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कृष्णकुंज परिसर आणि दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. तसेच ईडी कार्यालयाच्या परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये, यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकारी व मनसैनिकांना उपस्थित न राहण्यासाठी नोटीस बजाविल्या आहेत.

याआधी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर सुरुवातीला ठाणे बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र नंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. त्याचप्रमाणे २२ ऑगस्टला कार्यकर्ते आणि नेत्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर जमण्याचं आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत केलं होतं. पण काही वेळातच राज ठाकरे यांच्या आदेशानंतर हा निर्णयही मागे घेण्यात आला होता. मात्र यानंतरही कार्यकर्ते कायदा हातात घेण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी नोटीस बजावली होती. दरम्यान, आज सकाळी संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

दरम्यान, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे सकाळी शिवाजीपार्क येथे जॉगिंगसाठी आले असताना त्यांनी ‘ईडी’यट हिटलर’ असा शीर्षक असलेलं टीशर्ट परिधान केले होते. त्यावेळीच कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना ताब्यात घेतलं आहे.

इथे लग्न जमते - मराठी विवाह

हॅशटॅग्स

#RajThackeray(25)#SandeepDeshpande(4)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या