17 March 2025 8:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TDS New Rules l पगारदारांनो, 1 एप्रिल 2025 पासून TDS चे नवे नियम लागू, टॅक्स डिडक्शनमध्ये असे बदल होणार Yes Bank Share Price | येस बँक गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, शेअर्स प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK Rattan Power Share Price | 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ आला पेनी स्टॉक, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, शेअर प्राईस 42 रुपये, मिळेल 56% परतावा - NSE: IRB Horoscope Today | 18 मार्च 2025, कसा असेल तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस, तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 18 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या GTL Infra Share Price | शेअर प्राईस 1 रुपया 49 पैसे, 492% परतावा देणारा पेनी स्टॉक फोकसमध्ये - NSE: GTLINFRA
x

कोरोना आपत्ती: राज ठाकरेंकडून महाराष्ट्र सैनिकांना 'या' मार्गदर्शक सूचना

News Latest Updates, Raj Thackeray, Corona Crisis

मुंबई, १९ मार्च:  महाराष्ट्रासह देशात करोनाचे रोज नवे रुग्ण वाढत असल्याने केंद्र आणि राज्य सरकारांनी करोना रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही करोनाचा मुकाबला करण्यासाठी मनसे सैनिकांना सात सूचना केल्या आहेत. तसेच राज्यातील नागरिकांनाही दोन आठवडे सांभाळून राहण्याचं, एकमेकांच्या संपर्कात न येण्याचं, गर्दी आणि प्रवास टाळण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

मुंबई, पुण्यासह राज्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता ४९ झाली आहे, तर देशात १७० हून अधिक रुग्ण आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सरकारकडून राबवण्यात येत आहेत. कोरोना व्हायरसमुळे देशासह महाराष्ट्रातील जनजीवनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोरोना व्हायरसच्या संकटाला कसं तोंड द्यायचं, याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

‘माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो…’ असं सांगत राज ठाकरे म्हणाले की, आत्तापर्यंत आपण कोरोनाला जास्त फैलावू न देण्यात यशस्वी झालो आहे. कोरोना एकमेकांच्या सहवासातून होतो. म्हणून आपण जर कमी वेळा एकमेकांच्या जवळ गेलो आणि हे सुमारे दोन आठवडे केलं तर हा रोग पसरणार नाही.

१. आपण ज्या भागात रहातो तिथे लोक गोंधळलेल्या अवस्थेत असू शकतात. तिथे त्यांना दिलासा द्यायला पाहिजे. तिथे माहितीची कमी असेल, साधन-सोयींची कमतरता असेल तर योग्य ते करावे.

२. आपल्या शाखा-शाखांमध्ये किंवा कार्यालयांमध्ये आपण एका वेळी गर्दी होणार नाही असे पहावे. ती थोडी नियंत्रित करून, काहींना वेग-वेगळ्या वेळा देऊन गर्दी आटोक्यात आणावी. आपल्यामध्ये तीन फुटांचे अंतर राखावे.

३. आपल्या भागात जर कुणी सर्दी, तापानं आजारी असेल तर त्यांना धीर देऊन तपासणी करून घ्यायला सांगावे. त्यासाठी कुठलीही जोर-जबरदस्ती करू नये. त्यांचं मन तयार करावं आणि त्यांना आपल्या भागातील आरोग्य खात्याच्या कर्मचारी वर्गाशी भेट घालून द्यावी.

४. आपल्या भागात असे कुणी रूग्ण आढळल्यास प्रशासनाच्या किंवा आरोग्य खात्याच्या योग्य व्यक्तिंशी संपर्क राखून त्यांच्या देखरेखीखाली त्यांचे उपचार करावेत. आपली भूमिका ही आरोग्य खात्याला सहकार्याचीच असावी. संघर्षाची नव्हे.

५. आपल्या भागात जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा असल्यास तशी माहिती योग्य यंत्रणेला द्यावी. दुकानांमध्ये माल आहे की नाही ते पहावे. कुणी काळाबाजार करत असेल तर त्याची माहिती शासनाला द्यावी आणि लक्ष ठेवावे.

६. ज्यांचं हातावर पोट आहे अशी माणसं आपल्या भागात असतील. ती कोण आहेत ती शोधून त्यांची खाण्याची सोय नसेल तर ती करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या भागात काही जेष्ठ नागरिक, अपंग, इतर रूग्ण असतील तर त्यांना काही मदत लागल्यास ती देण्याचा प्रयत्न करावा.

७. महिला सेनेनी घराघरात जाऊन महिलांच्या आरोग्यविषयक किंवा काही अडचणी असतील तर त्या ऐकाव्यात. महिला सर्वसाधारणपणे बोलत नाहीत. त्यांचं ऐकावं आणि योग्य ती मदत करावी, असं आवाहन राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केलं आहे.

 

News English Summery:  Due to the increasing number of new coronary patients in the country including Maharashtra, the central and state governments have started efforts at the war level to prevent coronary disease. MNS president Raj Thackeray has also made seven suggestions to MNS soldiers to fight Corona Virus. He also appealed to the citizens of the state to take care of them for two weeks, to avoid contact with each other, to avoid rush and travel. So far we have succeeded in preventing the spread of corona. This illness results from intercourse. So possibly avoid contact with each other. Follow this diet for two weeks. Raj Thackeray has said that we will be successful in preventing corona. He appealed in the name of Maharashtra soldiers and made seven suggestions for it.

 

News English Title:  Story MNS Chief Raj Thackeray apple to MNS party workers due to corona virus News latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x