2 May 2025 4:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC
x

भाजपचं दूध दरवाढीवरून राज्यभर आंदोलन, महाविकास आघाडीवर जोरदार टीका

Mahavikas Aghadi government, Chandrakant Patil, Milk Rates

पुणे, १ जुलै : राज्यात दूध दरवाढावरुन तीव्र आंदोलन सुरु करण्यात आले आहे. हे आंदोलन विरोधी पक्ष भाजपकडून करण्यात येत आहे. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकरी नसले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकरी आहेत, त्यांनी तरी शेतकऱ्यांना भावना समजून शेतकरी हिताच्या निर्णयाला प्राधान्य दिले पाहिजे. सध्या कोरोनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था विस्कटलेली आहे. दूधधंदा हाच शेतकऱ्यांचा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे सरकारने दुधाला प्रति १० रूपये भुकटीला ५० रुपये अनुदान दिले पाहिजे असे आवाहन राज्य सरकार पाटील यांनी यावेळी केले.

पाटील म्हणाले,महाविकास आघाडीच्या सरकारने लोकहिताचे कोणतेही निर्णय घेतले नाही, कर्जमाफी देण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खते मिळाली नाही, पावसाने ओढ दिल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. कोरोनाने अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला वाचविण्यासाठी विशेष अनुदानाची गरज आहे. आतापर्यत केंद्र सरकारने राज्याला मदत केली नाही, अशी गरळ ओकणाऱ्या आघाडी सरकारला केंद्राने मोठे अनुदान दिले आहे. आतातरी राज्यसरकारने कोरोना हद्दपार केले पाहिजे.

दरम्यान, अमरावती येथे राज्यमंत्री बच्चू कडू दूध आंदोलकांच्या सोबत असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, त्यांना या आंदोलनावरुन भाजपला चिमटा काढलाआहे. ज्या ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे तेथे दुधाला किती भाव देण्यात येतो हे लक्षात घ्या. केवळ राजकारण करु नये, असा सल्लाही भाजपला दिला.

आज भाजपच्यावतीने दूध दरवाढीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने नुसते आंदोलन न करता केंद्राकडूनही निधी आणून दूध उत्पादक शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. यावेळी मंत्री बच्चू कडू यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला. भाजपने आंदोलन करतांना केंद्रातून निधी कसा आणता येईल याकडेही लक्ष दिले पाहिजे. या देशात केंद्र सरकारात आपण आहात. केंद्राने फक्त बघ्याची भूमिका घेऊ नये. भाजपची जिथे जिथे सत्ता आहे तिथे आपण दुधाला किती भाव देतो हेही तपासले पाहिजे, फक्त राजकारण करायचं म्हणून आंदोलन करु नये, असे बच्चू कडू म्हणाले.

 

News English Summary: Dairy farming is the only option for farmers. Therefore, the state government should provide a subsidy of Rs 50 per 10 kg of milk powder, Chandrakant patil appealed the state government.

News English Title: Mahavikas Aghadi government are neglected in farmers all problems in the state says Chandrakant Patil News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या