नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजाला ‘एसईबीसी’ प्रवर्गातर्गत दिलेले आरक्षण रद्द करण्याबाबत काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. पदव्युत्तर वैद्यकीयचे आतापर्यंत किती प्रवेश झाले याची सविस्तर आकडेवारीची माहिती सादर करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आज गुरुवारी होणार आहे.

वैद्यकीय आणि दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजाला ‘एसईबीसी’ प्रवर्गातर्गत दिलेले आरक्षण रद्द करण्याच्या हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशास महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हायकोर्टाच्या निकाल रद्द ठरवून प्रवेश प्रक्रिया ठरल्याप्रमाणे सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती याचिका राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. या याचिकेवर काल सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला आकडेवारी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

मराठा आरक्षण; वैद्यकीय शिक्षण प्रवेशाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी