2 May 2025 12:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा
x

म्हाडा मुंबईत काम करणाऱ्या महिलांसाठी हॉस्टेल उभारणार | सुप्रिया सुळेंची मागणी पूर्णत्वाला

Mhada, Hotel Development

मुंबई, १३ एप्रिल: मुंबईत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणी आणि महिलांसाठी एक महत्वाची बातमी आहे. येत्या काही दिवसांत ताडदेवमध्ये 1 हजार महिलांसाठी (वर्किंग वुमन्स) हॉस्टेल उभं करण्यात येणार आहे. तशी घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. तीन दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत काम करणाऱ्या तरुणी आणि महिलांसाठी हॉस्टेलबाबत निर्णय घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत जितेंद्र आव्हाड यांनी सुळे यांच्या मागणीची पुर्तता केली आहे.

“मुंबईत काम करणाऱ्या माताभगिनींसाठी राहण्याची व्यवस्था नसते. त्यांना वसई-विरार किंवा डोंबिवली पलिकडे जागा शोधावी लागते. त्यामुळे मुंबईत महिलांना राहण्याची सोय व्हावी यासाठी म्हाडानं पुढाकार घेतला आहे. याबाबत याआधी खासदार सुप्रिया सुळे यांनीही सूचना केल्या होत्या. तसंच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही याबाबत सुचवलं होतं”, असंही आव्हाड यांनी यावेळी सांगितलं.

मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात राज्यासह देशभरातून हजारो रुग्ण येतात. त्यांच्यातील अनेकांना निवासाची सोय नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना अनेकदा रस्त्यावर, फूटपाथवर रात्र काढावी लागते. पण आता ती वेळ येणार नाही. कारण, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून ‘म्हाडा’ने आपले 100 प्लॅट्स टाटा कॅन्सर हॉस्पिटलला देण्याचा निर्णय 25 मार्च रोजी घेतला आहे. तशी घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.

 

News English Summary: This is important news for young women and girls working in various fields in Mumbai. In the next few days, a hostel for 1000 working women will be set up in Taddev. The announcement was made by Housing Minister Jitendra Awhad.

News English Title: Mhada will develop hostel for 1000 working women in Mumbai news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Jitendra Awhad(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या