14 December 2024 11:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

सत्ता होती तेव्हा गोट्या खेळत होता का? इम्तियाज जलील यांचा पंकजा मुंडेंना टोला

MP Imtiyaz Jaleel, Pankaja Munde

औरंगाबाद: पक्षांतर्गत निर्माण झालेली खदखद आणि ‘माधव’ सूत्राच्या भोवती फिरणारी राजकीय अपरिहार्यता यातून सोमवारी औरंगाबाद येथे पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण आंदोलनास जलसमस्यांचे आवरण देण्यात भाजपच्या नेत्यांना यश आल्याचे दिसून आले. हे उपोषण गोपीनाथ प्रतिष्ठानच्यावतीने घेण्याचे पूर्वी पंकजा मुंडे यांनी जाहीर केले होते. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी पक्षाच्यावतीने हे उपोषण असल्याचे सांगितले आणि सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पक्षाचे सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर आदींनी उपोषणात सहभाग नोंदविला.

‘मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्ही सत्तेत असतानाच हाती घेतलेल्या योजना पुढे घेऊन जा, त्याचे आम्ही समर्थन करू; पण त्यास खोडा घालण्याचा प्रयत्न केला, तर भाजप नेत्या पकंजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावरून लढाई करू,’असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.

दरम्यान, विरोधकांनी मात्र या उपोषणावर टीका करताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना लक्ष केलं आहे. इम्तियाज जलील म्हणाले, “राज्यात पाच वर्ष सत्ता होती. तेव्हा काय गोट्या खेळत होता का, त्यावेळी का या गंभीर प्रश्नांसाठी तुम्ही काही केलं नाही. सत्ता असताना काही केलं नाही, मग आता कशाला नौटंकी करता.” “तुम्ही औरंगाबादमध्ये एकत्र आला आहात, आम्ही एवढे मुर्ख नाही किंवा जनता एवढी मुर्ख नाही. उद्या तुमचे समर्थक तुम्हाला प्रश्न विचारतील की जेव्हा सत्तेत होता तेव्हा का केलं नाही, सत्ता गेल्यावर नौटंकी कशाला”, असंही इम्तियाज जलील म्हणाले.

 

Web Title:  MIM MP Imtiyaz Jaleel criticised on BJP leader Pankaja Munde in Aurangabad.

हॅशटॅग्स

#MIM(30)#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x