9 June 2023 12:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्यात निवडणुकीपूर्वी दंगलीची मालिका! MIM आणि भाजप नेत्यांचे चार्टर्ड विमान ते घरोब्याचे संबंध आणि औरंगजेब स्क्रिप्टची राजकीय चर्चा रंगली Numerology Horoscope | 09 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पटापट तपासून घ्या Dynacons Systems Share Price | डायनाकॉन्स सिस्टीम्स शेअरने मालामाल केले, 3 वर्षात 2450 टक्के परतावा दिला, खरेदी करणार? Graphite India Share Price | 3.50 रुपयाच्या ग्रेफाइट इंडिया शेअरने 10636% परतावा दिला, तज्ज्ञांचा पुन्हा हा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस? Guru Rashi Parivartan | पुढील एक वर्ष या राशींवर राहील देव गुरूंचा आशीर्वाद, फायद्याच्या अनेक शुभं घटना घडतील RVNL Share Price | सरकारी RVNL शेअरने एका दिवसात 9 टक्के परतावा दिला, 1 वर्षात दिला 295% परतावा, फायदा घेणार?
x

फडणवीस राज्यातील अतिवृष्टी भागाचा पाहणी दौरा करणार | सुरुवात बारामतीपासून

BJP leader Devendra Fadnavis, baramati Tour

मुंबई, १७ ऑक्टोबर : राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झालं आहे. आस्मानी संकटांमुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे.

नुकसानग्रस्त शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे येत्या 19 ऑक्टोबरपासून 3 दिवसांचा दौरा करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीपासून सुरूवात होणार आहे.

आपल्या दौऱ्याची सुरुवात देवेंद्र फडणवीस हे बारामतीपासून करणार आहेत. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना होतील.

पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजेच २० ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तर तिसर्‍या दिवशी (२१ ऑक्टोबर) रोजी हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील. या तीन दिवसांत देवेंद्र फडणवीस हे नऊ जिल्ह्यांमध्ये सुमारे ८५० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत.

 

News English Summary: In the state of Marathwada and Western Maharashtra, heavy rains have caused severe damage due to return rains. Due to the heavenly crisis, Baliraja is in a state of panic. Former Chief Minister and Leader of Opposition in the Legislative Assembly Devendra Fadnavis will pay a three-day visit from October 19 to provide relief to the affected farmers and inspect the damage. Devendra Fadnavis’s tour will start from NCP President Sharad Pawar’s Baramati.

News English Title: BJP leader Devendra Fadnavis will take tour overcast areas in Maharashtra News updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x