28 May 2022 4:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | या शेअरने फक्त 1 वर्षात 10 हजाराच्या गुंतवणुकीचे तब्बल 23 लाख रुपये केले Mutual Fund SIP | या फंडाच्या महिना 10 हजाराच्या एसआयपीने अल्पावधीत 17.58 लाख मिळाले | तुम्हीही नफा कमवाल Fake Reviews on e-Commerce | ई-कॉमर्स वेबसाइट्सवरील बनावट रिव्ह्यू | ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्यांवर लगाम लागणार Tata AIA Life Insurance | टाटा एआयए स्मार्ट व्हॅल्यू इन्कम इन्शुरन्स प्लॅन लाँच | पॉलिसीचे फायदे जाणून घ्या Multibagger Penny Stocks | अदाणींची या कंपनीत एन्ट्री | 1 महिन्यांत 7 रुपयांच्या शेअरने 160 टक्के परतावा Tesla Motors | भारतात होणार जगप्रसिद्ध टेस्ला कारचे उत्पादन? | एलॉन मस्क यांनी दिली मोठी माहिती CIBIL Score | चांगला सिबिल स्कोअर म्हणजे काय ज्यावर तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळेल | स्कोअर असा तपासा
x

VIDEO | एकनाथ खडसे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा एकाच गाडीने प्रवास

NCP leader Anil Deshmukh, Eknath Khadse

जळगाव, १७ ऑक्टोबर : गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. आता चर्चेला नवीन वळण मिळाले आहे. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेर हत्याकांड प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख रावेरमध्ये दाखल झाले आहेत. रावेर येथील विश्रामगृहात अनिल देशमुख एकनाथ खडसे यांची भेट झाली असून या भेटीबाबत पूर्णपणे गुप्तता पाळण्यात आली. विश्राम गृहावरून अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे एकाच गाडीने घटनास्थळी निघाले आहेत.

शुक्रवारी जळगाव जिल्ह्यातील रावेर बोरखेडा शिवरातील चार अल्पवयीन बालकांची हत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज कुटूुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी एकनाथ खडसे आणि अनिल देशमुख तेथे एकत्र पोहोचले.

दरम्यान, खडसे हे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. याबाबत पत्रकारांनी खडसे यांना विचारले असता त्यांनी नो कमेंट्स म्हणत चर्चा थांबवली. तसेच हे सगळे मुहूर्त माध्यमांनीच ठरवले आहेत, असे खडसे म्हणाले होते. मात्र, आज पुन्हा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने आणि गुप्त बैठक घेतल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

 

News English Summary: There is talk that senior BJP leader Eknath Khadse, who has been angry for the last several days, will join the NCP. Now the discussion has taken a new turn. Eknath Khadse has met NCP leader and state Home Minister Anil Deshmukh. Home Minister Anil Deshmukh has filed a case against Raver in Jalgaon district. Anil Deshmukh met Eknath Khadse at a rest house in Raver and the meeting was kept completely secret.

News English Title: NCP leader Anil Deshmukh and Eknath Khadse travel in the same vehicle News Updates.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(92)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x