2 May 2025 7:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

त्या धमकीतून ED, CBI, न्यायालयं आमच्या हातात आहे असं चंद्रकांत पाटील यांना सुचवायचं आहे का? - भुजबळ

Minister Chhagan Bhujbal

मुंबई ०३ एप्रिल | आज एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटलांच्या धमकीला उत्तर दिलं. ते म्हणाले की, “चंद्रकांत पाटील यांनी पराभवसुद्धा सहन करण्याची शक्ती ठेवली पाहिजे. त्यांच्या दुर्दैवाने यापुढे वारंवार त्यांना पराभवाचे फटके बसणार आहेत. त्यामुळे पराभव सहन करण्याची शक्ती ठेवून त्यांनी थोडं सांभाळून बोललं पाहिजे” असं भुजबळांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळांचा पुतण्या माझ्याकडे सोडवण्याची विनवणी करत होता असं त्यांचं म्हणणं आहे. पण माझा पुतण्या म्हणजे समीर भुजबळला माझ्या दोन महिने आधी जेलमध्ये टाकलं होते. मग तो कधी जाईल यांच्याकडे? मुलाचं बोलाल तर तो लांबच होता. त्यामुळे कोण पुतण्या आणि कशासाठी काढला हे माहिती नाही,” असं भुजबळांनी म्हटलं आहे.

माझ्या केसेस कोर्टात असताना ते महागात पडेल असं म्हणत असतील तर त्याचा काय अर्थ समजायचा. ईडी, सीबीआय यांना जसं हातातील शस्त्र म्हणून वापरत आहेत तसं आता न्यायपालिकाही हातात आहे असं सुचवायचं आहे का?,” अशी विचारणा भुजबळांनी केली.

माझ्याआधी माझ्या पुतण्याला अटक झाली, मग तो चंद्रकांत पाटील यांच्याकडे कधी जाईल, असा प्रश्न विचारत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा खोडून काढला आहे. चंद्रकांत पाटील यांचं बोलणं मूर्खपणाचं आहे, असंही भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ तुरुंगात असताना त्यांना जामीन मिळावा, यासाठी त्यांचा पुतण्या समीर भुजबळ आपल्या बंगल्यावर तासनतास बसलेले असायचे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. शिवाय छगन भुजबळांना जामीन मिळवून द्या, आम्ही कधीही राजकारणात दिसणार नाही, असंही समीर भुजबळ म्हणाल्याचा पाटील यांनी सांगितलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या या दाव्यावर छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया एबीपी माझाकडे दिली.

छगन भुजबळ म्हणाले की, “माझा पुतण्या समीर भुजबळ यांना माझ्याआधीच अटक करण्यात आली होती. मग माझा पुतण्या यांच्याकडे कधी जाईल? माझा मुलगा पंकजलाही समन्स बजावल्याने तोही कधी त्यांच्याकडे गेला नाही. मग यांनी कोणता पुतण्या शोधून काढला? असं छगन भुजबळ म्हणाले. चंद्रकांत पाटील यांचं बोलणं मूर्खपणाचं आहे, असंही त्यांनी म्हटलं.

 

News English Summary: Speaking to ABP Majha today, Chhagan Bhujbal responded to Chandrakant Patil’s threat. He said, “Chandrakant Patil should have the strength to endure even defeat. Unfortunately for them, they are going to be defeated again and again. Therefore, they should speak with a little caution, keeping the strength to endure defeat, ”said Bhujbal.

News English Title: Minister Chhagan Bhujbal reply to Chandrakant Patil after his threat about court bail news updates.

 

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या