9 May 2025 11:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पगारदारांनो, या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 2 लाख रुपये जमा करा, मिळावा 89,989 रुपये निश्चित व्याज Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 10 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हल जवळ, अपडेट जाणून घ्या - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | कंपनीच्या टोल उत्पन्नात वाढ; शेअर प्राईसवर होणार सकारात्मक परिणाम - NSE: IRB NTPC Share Price | एनटीपीसी शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, मंदीत स्वस्तात BUY करा - NSE: NTPC AWL Share Price | मल्टिबॅगर शेअरमध्ये मोठ्या तेजीचे संकेत, ग्लोबल ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: AWL
x

आंबे खाल्ल्यावर मुलं होतात असे बोलणाऱ्यांनी संकटाच्या काळात समाजाची दिशाभूल करु नये

Minister Jayant Patil, Sambhaji Bhide

मुंबई, ११ एप्रिल: कोरोना हा ‘त्या’ वृत्तीच्या लोकांना होतो, कोरोनाने मरणारे जगण्याच्या लायक नव्हते’, असे वादग्रस्त विधान करणारे शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी टीकास्त्र सोडले. सांगतील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ‘कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि समाज एकत्र येऊन प्रयत्न करत आहे, अशा परिस्थितीत दिशाभूल करणारी वक्तव्ये करणे योग्य नाही. आवश्यकता वाटल्यास वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल’, असा इशारा जयंत पाटलांनी संभाजी भिंडेचे नाव न घेताल दिला.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, सध्या परिस्थिती बिकट आहे. अशा कोरोनाच्या संकटकाळात समाजात गैरसमज करणारी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत. अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. अशावेळी आंबे खाल्ल्यावर मुले होतात, अशा प्रवृत्तीच्या लोकांकडून गैरसमज करणारी विधाने होत असतील तर ते अयोग्य आहे. एरवी अशी वक्तव्यं खपून जातात. पण सध्याच्या काळात अशा वक्तव्यांमुळे त्या संकटाचे गांभीर्य कमी होते. त्यामुळे अशी वक्तव्ये कायद्याच्यादृष्टीने तपासून त्यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

कोरोना हा गां** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे: संभाजी भिडे
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मास्कबाबत बोलताना शिवी हासडलीय. “कोरोना हा रोग नाही. कोरनाने माणसं मरतात ती जगायला लायक नाहीत. दारुची दुकाने उघडी त्याला परवानगी आणि कुठं काय विकत बसलाय त्याला पोलीस लाठी मारतात. काय चावटपणा चाललाय? हा नालायकपणा आहे. लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. असलं हे शासन फेकून दिलं पाहिजे. अजिबात उपयोगाचं नाही. मी काही राजकीय माणूस नाही, माझ्यासारखी असंख्य लोक अस्वस्थ आहेत संपूर्ण देशात. हा मूर्खपणा सुरु आहे. कोरोना हा रोगच नाहीय. हा गां* वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं.

 

News English Summary: It is not appropriate to make misleading statements in a situation where the Maharashtra government and society are working together to tackle the Corona crisis. If necessary, action will be taken against those who make controversial statements’, warned Jayant Patil without naming Sambhaji Bhinde.

News English Title: Minister Jayant Patil slams Sambhaji Bhide over his controversial statement news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या