27 June 2022 1:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
रविवारी कोर्ट बंद असतं | संध्याकाळी 6.30 वाजता शिंदे गटाची केस सुप्रीम कोर्टात | 7.30 ठरलं उद्या सुनावणी | नेटिझन्सच्या दिलासा चर्चा Multibagger Stocks | छोटे शेअर्स वेगात | या 13 रुपयाच्या शेअरने 1 वर्षात तब्बल 1481 टक्के परतावा दिला Mutual Fund SIP | महीना 1000 रुपयांच्या एसआयपीने तुम्हाला 32 लाख रुपये मिळतील | अधिक जाणून घ्या Eknath Shinde | शिंदे गटाला 'दिलासा' मिळावा म्हणून थेट सुप्रीम कोर्टात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे? Horoscope Today | 27 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Diabetes Symptoms | मधुमेह कुठल्याही वयात होऊ शकतो | ही प्राथमिक लक्षणे तुम्हाला आहेत का खात्री करा Multibagger Stocks | हा 39 रुपयांचा शेअर तुमच्यकडे आहे? | फक्त 21 दिवसात 164 टक्के परतावा दिला
x

कुलगुरू, युसीजीसोबत चर्चा करूनच परीक्षा रद्द केल्या, ATKT'च्या विद्यार्थ्यांनीही दिलासा - उदय सामंत

Minister Uday Samant, Final Year Atkt Ekams, Maharashtra UGC Decision

मुंबई, ९ जुलै: विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) अंतिम वर्षाच्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. मात्र, युजीसीने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं अशक्य असल्याचं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

उदय सामंत यांनी सांगितलं की, या संदर्भात आम्ही महाराष्ट्रातील सर्व कुलगुरू आणि विविध शैक्षणिक संस्थांचे संचालक यांच्यासोबत परीक्षांसदर्भात चर्चा केली. मात्र, 30 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेत येणार नाही, अशा प्रतिक्रिया कुलगूरू आणि शिक्षण संचालकांनी दिली आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच यूजीसीसोबत पत्रव्यवहार करुनच राज्य सरकारने अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, असंही सामंत यांनी यावेळी नमूद केलं.

उदय सामंत पुढे म्हणाले की, “अनेक लोकांनी मी यूजीसीला पत्र का लिहिलं असा प्रश्न विचारत आकांडतांडव केलं. मी 17 मे रोजीच यूजीसीला अंतिम परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. राज्यातील सर्व कुलगुरुंसोबत चर्चा केली. मी अनेक तज्ज्ञांशीही बोललो. त्यांनी परीक्षा न घेण्याबाबतच मत नोंदवलं. यानंतर आपतकालीन समितीची देखील बैठक झाली. यात अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत देखील यूजीसीला पत्र देण्यात आलं.”

युसीजने सप्टेंबर अखेरपर्यंत परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, सप्टेबरपर्यंत परिस्थिती आणखी बिघडल्यास पुढचा निर्णय घेण्यात येईल, असं सांगून संभ्रम निर्माण केला आहे. मुळात सप्टेंबर अखेरपर्यंत परीक्षा घेता येणार नाहीतच. मात्र सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना संभ्रमातच ठेवायचं का असा सवालही सामंतांनी उपस्थित केला.

“त्यानंतर कुलगुरू ठरवतील त्याप्रमाणे निर्णय घेण्याचं शासनानं ठरवलं. समितींनं ६ मे रोजी आपला अहवाल सादर केला. त्यानंतर आम्ही राज्यपालांशी यासंदर्भात चर्चा केली आणि ८ मे रोजी शासनानं समितीचा अहवाल स्वीकारला. त्यानंतर १७ मे रोजी मी यूजीसीला अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची केली. व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भातही पत्रव्यवहार करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून परीक्षा रद्द करण्याची विनंती केली होती. लाखो विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

News English Summary: The University Grants Commission (UGC) has issued an order to take it by the end of September of the final year. However, as per the decision given by UGC, it is impossible to conduct the exam in Maharashtra till September, said Uday Samant, Minister of State for Higher and Technical Education in a press conference.

News English Title: Minister Uday Samant Speaks About Final Year Atkt Ekams In Maharashtra Ugc Decision Mumbai Press Conference News latest updates.

हॅशटॅग्स

#UdaySamant(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x