15 December 2024 1:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

सत्ताधारी घरी बसले आहेत, त्यांना लोकांची चिंता नाही - देवेंद्र फडणवीस

Opposition leader Devendra Fadnavis, MahaVikas Aghadi Govt, Corona Virus

जळगाव, ९ जुलै : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागात दौऱ्यावर असलेले माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘सत्ताधारी घरी बसले आहेत, त्यांना लोकांची चिंता नाही. त्यांनी आमच्या दौऱ्यावर कीतीही टीका केली तरी लोकांना बरे वाटते की कुणी तरी आमची दु:ख पाहत आहे. आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे राजकारण करीत नाही, आम्ही राजकारण जनतेकरीता करतो’, असा टोला त्यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस आज जळगाव दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुरुवातीला त्यांनी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे आमदार उपस्थित होते.

पारनेरमधील राजकारणावरुन टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी, कोणत्या जगात ही मंडळी जगत आहेत हे माहिती नाही. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन करोनाचा सामना कसा करायचा याचा विचार केला पाहिजे. सरकारमध्ये विसंवाद असून महाराष्ट्राला याचा फटका बसत आहे अशी टीका केली.

सामनामधून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “सामना दुर्दैवाने केवळ सरकार सांभाळण्याचं काम करत आहे. सामना आधी शिवसेनेचं होतं पण आता तिन्ही पक्षाचं मुखपत्र आहे. दुर्दैवाने माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वात जी तत्वं पाळली, ज्या तत्वांचा विरोध केला आज त्यांचीच पाठराखण केली जात आहे”.

 

News English Summary: Opposition leader Devendra Fadnavis has once again criticized the state government. He said, ‘The authorities are sitting at home, they don’t care about the people duirng corona crisis News Latest Updates.

News English Title: Opposition leader Devendra Fadnavis on MahaVikas Aghadi Govt News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x