26 April 2024 12:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा
x

ग्रामपंचायत निवडणूक | मोर्चेबांधणीसाठी स्वतः राज ठाकरे पुणे दौऱ्यावर

MNS Chief Raj Thackeray, Pune tour, Grampanchayat Election 2020

मुंबई, १९ डिसेंबर: महाराष्ट्रातील तब्बल १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा अधिकृत निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर (Election Commission announces election program for 14 thousand 234 Gram Panchayat in Maharashtra) करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात एप्रिल ते डिसेंबरमध्ये या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून, १५ जानेवारीला मतदान होणार आहे, तर १८ जानेवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे.

दरम्यान, राज्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व ठिकाणी उमेदवार उभे करा, ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवा, असे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व जिल्हाध्यक्षांना दिले होते. त्यामुळे मनसेही या निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आदेश दिल्यानंतर आता राज ठाकरे स्वत: देखील सक्रिय होणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांच्या तयारी आणि मोर्चेबांधणीसाठी राज ठाकरे शनिवारी संध्याकाळी पुण्यात दाखल होत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीची रणनीती निश्चित करणार असल्याचे वृत्त आहे.

प्राथमिक माहितीनुसार राज ठाकरे साधारण सहाच्या सुमारास पुण्यात दाखल होतील. ते दोन दिवस पुण्यात मुक्काम करणार आहेत. मनसेकडून पुण्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार उभे केले जाणार आहेत. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून तालुका पातळीवर मनसे नेत्यांच्या आढावा बैठका सुरु आहेत. आतापर्यंत इंदापूर, दौंड, मुळशी, शिरूर तालुक्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका पार पडल्या आहेत. या सगळ्याचा अहवाल आता राज ठाकरे यांच्यासमोर मांडला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर मनसेकडून ग्रामपंचायत निवडणुकीची रणनीती निश्चित केली जाईल.

 

News English Summary: After giving orders to party office bearers and workers, now Raj Thackeray himself will also be active. Raj Thackeray is arriving in Pune on Saturday evening to prepare for the Gram Panchayat elections and to form a front. It is learned that he will hold a meeting of the key office bearers of the district to decide the election strategy.

News English Title: MNS Chief Raj Thackeray on Pune tour over Grampanchayat Election 2020 news updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x