11 December 2024 4:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
x

काँग्रेस अध्यक्ष पदासाठी जवळपास सर्वच नेत्यांची राहुल गांधींना पसंती

Senior congress leaders, Rahul Gandhi, Randeep Surjewala

नवी दिल्ली, १९ डिसेंबर: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडेच पक्षाचे अध्यक्षपद देण्याचं जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची बैठक सुरू असून या बैठकीत राहुल गांधी यांच्याकडेच काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याची मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांनी लावून धरल्याने त्यावरच या बैठकीत प्रामुख्याने चर्चा सुरू असून राहुल यांच्याकडेच पक्षाची सूत्रे देण्यावर जवळपास एकमत झाल्याचंही सूत्रांनी सांगितलं. याबाबतची अधिकृत घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे. It is being said that it is almost certain that Congress leader Rahul Gandhi will be given the chairmanship of the party.

काँग्रसच्या नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी लवकरच निवड प्रक्रिया सुरू होईल. काँग्रेसचे इलेक्ट्रोल कॉलेज, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य, काँग्रेस कार्यकर्ते आणि सदस्य हे या पदासाठी जो योग्य आहे त्याची निवड करतील. माझ्यासह काँग्रेसच्या ९९.९ टक्के लोकांना वाटतं की राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष बनावेत. असं सुरजेवाला यांनी म्हटलं असल्याचं एएनआयाने वृत्त दिलं आहे. 99.9% of people including me want Rahul Gandhi to be elected as party president said Randeep Surjewala.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी पक्षाची बैठक सुरू आहे. कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच ही बैठक होत आहे. या बैठकीला काँग्रेसमधील संघटनात्मक बदल करण्याची मागणी करणाऱ्या 23 नेत्यांसह इतर वरिष्ठ नेतेही सहभागी झाले आहेत. या बैठकीत बिहार निवडणुकीच्या पराभवाची समीक्षा करतानाच पश्चिम बंगाल आणि पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद देण्याची मागणी अनेक वरिष्ठ नेत्यांनी केली आहे. पक्षातील नेत्यांची ही मागणी सोनिया गांधी यांनी गंभीरपणे घेतली असून त्यांनीही राहुल यांच्याकडे पक्षाची धुरा देण्याचे जवळपास निश्चित केल्याचं बोललं जात आहे. The party is holding a meeting at his residence under the chairmanship of interim Congress president Sonia Gandhi.

 

News English Summary: The selection process for the election of the new President of the Congress will begin soon. The Electoral College of Congress, members of the All India Congress Committee, Congress workers and members will select the one who is suitable for the post. 99.9 per cent of the Congress people, including me, think that Rahul Gandhi should become the Congress President. ANI has reported that Surjewala has said so.

News English Title: Most senior congress leaders want Rahul Gandhi to be elected as party president said Randeep Surjewala news updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x