12 August 2020 11:47 AM
अँप डाउनलोड

निवेदन असं उभं राहून स्वीकारतात? तावडेंचा 'स्टॅन्ड अप कॉमेडी' विनोदी फोटो व्हायरल

Raj Thackeray, Vinod Tawde, MNS

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा म्हणजे स्टँड अप कॉमेडी शो आहेत असं म्हणत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे. शुक्रवारी नांदेडमध्ये शो पार पडला आता लवकरच महाराष्ट्रात आणखी काही ठिकाणी त्यांचे स्टँड अप कॉमेडी शो पार पडणार आहेत, असं विधान देखील तावडे यांनी उपरोधाने म्हटले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

राज ठाकरे सध्या मोदी आणि अमित शाह यांना संपवण्याची भाषा करत आहे. राज ठाकरेंच्या पक्षाचा एकही खासदार नाही, एकही आमदार नाही, उरलेसुरले नगरसेवकही पक्ष सोडून गेले आहेत. त्यामुळे स्वतःचा पक्ष संपलेला असताना दुसऱ्याला संपवण्याची भाषा राज ठाकरे करत आहेत असाही टोला तावडे यांनी लगावला.

मात्र महाराष्ट्र सैनिकांनी राज्याचा सांस्कृतिक मंत्री जेव्हा सामान्य जनतेकडून एखादं निवेदन स्वीकारतात तेव्हा आजूबाजूला उपस्थित असणारे रोज त्यांची ‘स्टॅन्ड-अप कॉमेडी’ पाहून हसत असतात असा उपरोधिक टोला लगावला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचं संस्कृतिक खातं संभाळणाऱ्या विनोद तावडे यांनी आधी स्वतः नीट उभं राहून सामान्य जनतेची निवेदन स्वीकारावी, नाहीतर उपस्थितांना तुमची ‘स्टॅन्ड-अप विनोदी कॉमेडी’ देखील रोज अनुभवण्यास मिळते, असा टोला समाज माध्यमांच्या माध्यमातून लगावला आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Vinod Tawde(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x