निधीचं आमिष द्यायला हाती काहीच नसताना मनसेची ग्राम पंचायतीत चांगली कामगिरी
पुणे, १८ जानेवारी: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. १५ जानेवारी रोजी राज्यातील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीसाठी सरासरी ७९ टक्के मतदान झाले. आज सकाळपासून या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली.
ही निवडणूक गाजली ती राज्यातील मोठ्या पक्षांनी ग्रामपंचायतींना दिलेल्या मोठ्या निधी वचनाची. मात्र याबाबतीत मनसेच्या उमेदवारांकडे कोणतीही अर्थशक्ती नसताना देखील पक्षाने चांगली कामगिरी केल्याचं मान्य करावं लागेल. कारण ग्राम पंचायत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेणं हा नक्कीच धाडसी निर्णय होता. तो देखील राज्यातील ३ प्रमुख पक्ष एकत्र आणि भाजप सारखा श्रीमंत पक्ष समोर असताना. यामध्ये सर्वात प्रथम दखल घ्यावी लागेल ती यवतमाळ मधील राजू उंबरकर यांच्या कामगिरीची.
कारण यवतमाळमध्ये मनसेला घवघवीत यश मिळाले आहे. येथील वणी मतदारसंघ हा मनसेचा बालेकिल्ला मानला जातो. येथील 15 ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा फडकला आहे. मनसेने जिंकलेल्या 15 ग्रामपंचायतींमध्ये शिरपूर, मोहूर्ली, येनक, खांदला, खांदला, चंडकापुर, बाबापूर, मोहदा, शिंदी, माहागाव , गदाजी बोरी, करणवाडी या गावांचा समावेश आहे.
त्यानंतर ग्रामीण भागात मनसेने चांगली कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील हिवरे ग्रामपंचायतीमधील सातपैकी 5 जागांवर मनसेने विजय मिळवला. त्यानंतर अहमदनगरच्या शिरसटवाडी ग्रामपंचायमध्ये मनसेचे 9 सदस्य विजयी झाले आहेत. तर अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील खैरी सावंगी वाढोणा गट ग्रामपंचायतींमध्ये मनसेचे ०७ पैकी ०७ उमेदवार विजयी झाले आहेत. आर्णी तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायतीमध्ये सातपैकी सहा जागांवर मनसेचा विजय झाले आहेत. बीडमध्ये सुमंत धस यांच्या नैत्रुत्वात केज तालुक्यातील नारेवाडी ग्रामपंचायतमध्ये मनसेने ७ पैकी ५ जागांवर विजय प्राप्त केला. दुसऱ्या बाजूला वर्धा, चंद्रपूर, नांदेड, बुलढाणा आणि जालन्यात देखील मनसेने प्रवेश केला आहे.
दरम्यान, मनसेच्या बाबतीत सकाळ पहिली आनंदवार्ता आली ती अंबरनाथमधून. अंबरनाथ तालुक्यातील काकोळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला ज्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या युतीच्या पॅनलचा पराभव करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पॅनेलने वर्चस्व निर्माण केले. काकोळी ग्रामपंचायतीची निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची होती. या ग्रामपंचायतीवर एकूण ७ सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्यापैकी मनसेचे ४ सदस्य विजयी झाले आहेत.
यामध्ये एक नकारात्मक गोष्ट म्हणजे मनसेचं सुस्तावलेलं सोशल मीडिया अधिकृत पेज. यासर्व दिनक्रमात प्रसार माध्यमांना संबंधित राजकीय पक्षांच्या सोशल मीडिया पेजवरून अधिकृत माहिती मिळत असल्याने त्याचा फायदा त्यांना झाला. मात्र मनसेची सोशल मीडिया टीम किंवा सोशल मीडिया हॅन्डलर दिवसभर कुठे होते ते समजण्यास मार्ग नाही. कारण मनसेच्या फेसबुक आणि ट्विटवर पेजवर शेवटचे अपडेट्स हे १४ आणि १५ जानेवारीच्या दिसत आहेत. विशेष म्हणजे मनसेचं सोशल मीडिया माध्यम शुभेच्छा, जयंती, अमुक-अमुक राष्ट्रीय वा जागतिक दिनाच्या शुभेच्छा यापुरताच मर्यादित झाल्याचं पाहायला मिळतं. त्यात प्रत्यक्ष जमिनीवर लोकांमध्ये काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं की मनसे अधिकृत पेजवर आमची सामाजिक कामं प्रसिद्ध करण्यासाठी देखील कोणत्या तरी वरिष्ठांचा संबधी हॅन्डलरला फोन जावा लागतो आणि अनेकदा तो जाऊनही प्रसिद्धी दिली जातं नाही जे इतर पक्षांच्या बाबतीत पाहायला मिळत नाही.
News English Summary: The results of the Gram Panchayat elections in the state are being announced today. On January 15, about 12 thousand 711 Gram Panchayat elections were held in the state. The turnout was 79 percent. The results of this Gram Panchayat election started to be announced from this morning.
News English Title: MNS party status in gram panchayat election 2021 result news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC