12 December 2024 9:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

केंद्र सरकारकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याचे प्रयत्न सुरू | वनमंत्र्यांचा दावा

Modi government, President rules, Maharashtra, Forest minister Sanjay Rathod

यवतमाळ, 23 नोव्हेंबर: ‘सत्ताधारी असताना देखील आज राज्य सरकारला त्रास होत आहे. मी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात असल्याने मला सर्व माहिती आहे. परंतु ते सर्व जाहीरपणे सांगता येणार नाही, परंतु उद्धवजी ठाकरेंना देखील प्रचंड त्रास होत आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याचे प्रयत्न सुरू आहे,’ असा मोठा आणि खळबळजनक दावा महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांनी केला आहे.

‘राज्यात महाविकास आघाडीचं नवं समीकरण असलं तरी शिवसेनेला पुढील काळात स्वबळावर सर्व निवडणुका लढवायच्या आहेत,’ असे आवाहन यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी शिवसैनिकांना केले. जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात संजय राठोड उपस्थितांना संबोधित करत होते. त्यांच्या या विधानामुळे जिल्ह्यातील महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘शिवसैनिकांनो आगामी नगर पंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषदच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढायच्या आहेत. त्यादृष्टीने जोमानं तयारीला लागा, जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादी पक्षात शिवसेनेपेक्षाही अधिक भांडणं असल्याने 50 टक्के अशासकीय समित्यांवर शिवसैनिकांची नियुक्ती केली जाईल. आता त्यांची वाट बघणार नाही,’ अशी देखील घोषणा संजय राठोड यांनी केली आहे.

 

News English Summary: Even when in power, the state government is suffering today. All I know is that I am in the cabinet of the Mahavikas Aghadi government. But it is not possible to say it all openly, but Uddhavji Thackeray is also suffering a lot. The central government is trying to impose presidential rule in Maharashtra, ‘said Sanjay Rathore, Forest Minister in the Mahavikas Aghadi government.

News English Title: Modi government want to impose President rules in Maharashtra said forest minister Sanjay Rathod news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x