मावळ : प्राथमिक फेरीनंतरच मावळ मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे मोठ्या फरकाने पुढे आहेत. त्यानुसार पार्थ पवार जवळपास ४० हजार मतांच्या फरकाने पिछाडीवर आहेत. त्यामुळे हा अजित पवार आणि पवार कुटुंबियांना मोठा धक्का लागू शकतो असं चित्र सध्या तरी दिसत आहे. दरम्यान मतांमधील फरक वाढतच असून त्यातून राष्ट्रवादीमध्ये चिंतेच वातावरण आहे.
त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील हि मोठी घटना समजली जात असून त्याचा थेट फटका आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला या पट्यात बसू शकतो असं म्हटलं जात आहे.
