पुणे, १ ऑक्टोबर: काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत भूमिकेविरोधात जाहीर भूमिका घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा ट्वीट केलं आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात हे ट्वीट असून त्यामुळं पुन्हा एकदा भुवया उंचावल्या आहेत.

राज्यातील मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यापासून मराठा समाजात अस्वस्थता आहे. मराठा संघटनांनी लढण्याची भूमिका घेतली आहे. याच मुद्दयावरून बीड जिल्ह्यात विवेक राहाडे या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. बीड तालुक्यातील केतुरा गावातील हा तरुण आहे. आत्महत्येपूर्वी त्यानं चिठ्ठीही लिहून ठेवली आहे. याच घटनेच्या अनुषंगानं पार्थ पवार यांनी ट्वीट केलं आहे.

“मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याची बातमी ऐकून धक्का बसला आहे. अशा दुर्दैवी घटनांची मालिका सुरु होण्याआधी मराठा नेत्यांनी जाग व्हावं आणि लढावं. महाराष्ट्र सरकारने तोडगा काढण्यासाठी पावलं उचलावीत अशी विनंती आहे,” असं पार्थ पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. पार्थ पवार यांनी ट्विटमध्ये आत्महत्या केलेल्या तरुणाचा आणि त्याने लिहिलेल्या पत्राचा फोटो शेअर केला आहे.

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “विवेकच्या आत्महत्येने आमच्या मनात जी आग पेटवली आहे त्याने संपूर्ण व्यवस्था खाक होऊ शकते. संपूर्ण पिढीचं भविष्य धोक्यात आहे. सुप्रीम कोर्टात जाऊन हस्तक्षेप याचिका दाखल करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय माझ्यासमोर शिल्लक नाही”.

 

News English Summary: Deputy Chief Minister Ajit Pawar’s son Parth Pawar on Thursday said he will approach the Supreme Court over the Maratha reservation issue after a youth allegedly died by suicide over the cause.Parth, who is also the grandson of Nationalist Congress Party (NCP) founder Sharad Pawar, also urged other Maratha leaders and the Maha Vikas Aghadi (MVA) government in Maharashtra to “wake up and fight for this cause”.

News English Title: NCP Leader Ajit Pawars son Parth Pawar Tweet On Beed Suicide Maratha Reservation Supreme Court Marathi News LIVE latest updates.

विवेकच्या आत्महत्येने आमच्या मनात आग पेटवली आहे | त्याने संपूर्ण व्यवस्था खाक होईल – पार्थ पवार