कोरोना आपत्ती | प्रवीण दरेकरांना महाराष्ट्र द्वेषाने एवढं पछाडलं की...

मुंबई, १० मे | मुंबईतील कोरोना मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे, असे घडत आहे. त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होतेय. हे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे.
दुसरीकडे, प्रवीण दरेकर यांनीही मुंबई महापालिका आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. त्याला उत्तर देणं अपेक्षित होतं. मात्र, उंटावरुन शेळ्या हाकण्याचा प्रकार मुंबई महापालिका गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहे. त्याचाच परिचय पुन्हा एकदा शिवसेनेनं दिला, अशा शब्दात दरेकरांनी जोरदार टोला लगावला.
भारतीय जनता पक्षाचेच राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी एकाबाजूला मुंबई महानगरपालिकेच्या कामावर संशय निर्माण केला आहे. त्यात मोदी त्यांची स्तुती करणारच नाहीत असं देखील भाजपचे नेते बोलू लागले. मात्र मुंबई महागरपालिकेच्या कामाचं आणि उत्तम नियोजनाचं आता पुन्हा केंद्रातून कौतुक झाल्याने देवेंद्र फडणवीस, दरेकर आणि भाजप नेत्यांना चांगलीच चपराक मिळाली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या उत्तर नियोजनाची पोचपावती देताना केंद्रीय नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी म्हटलं आहे की, “सेंट्रलाइझ बेड वाटप, ऑक्सिजन साठवणुकीची सोय, प्रायव्हेट इस्पितळातही बेडचे वाटप, देखरेखीसाठी डॅशबोर्ड, रूग्णांसाठी पाठपुरावा करणे. प्रेरणादायक कोविड नियोजन केल्याबद्दल मुंबई मॉडेल, बीएमसी आयुक्त चहल आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन’ असं त्यांनी म्हटलं आहे.
याच विषयाला अनुसरून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रवीण दरेकर आणि भाजप नेत्यांना चांगलेच सुनावले आहे. यासंदर्भात ट्विट करताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “एकीकडे मोदीजी महाराष्ट्राचं कौतुक करत आहेत , आज नीती आयोगाच्या अध्यक्षांनी देशभरात यशस्वी ठरत असलेल्या मुंबई मॉडेलचं कौतुक केलं आहे तर दुसरीकडे प्रवीणजी दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने एवढं पछाडलं आहे की त्यांना काय आरोप करावे याचं सुद्धा भान राहिलेलं नाहीये.
पुढे त्यांनी म्हटलं की, “वक्तव्य करून तुम्ही सन्माननीय पंतप्रधान मोदीजींचा अपमान करताय.नितीनजी गडकरींनी कालच्या एका भाषणात अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे , ते भाषण अजून तुमच्यापर्यंत आलेले दिसत नाही, वाटल्यास त्याची लिंक आम्ही तुम्हाला देऊ शकतो.”
News English Summary: Acknowledging the Mumbai Municipal Corporation’s answer plan, Central Policy Commission CEO Amitabh Kant said that centralized beds, oxygen storage facilities, beds in private hospitals, dashboards for care, follow-up for patients. Congratulations to Mumbai Model, BMC Commissioner Chahal and his team for inspiring covid planning. Following this issue, NCP’s women state president Rupali Chakankar has spoken well to Praveen Darekar and BJP leaders.
News English Title: NCP leader Rupali Chakankar criticized opposition leader Pravind Darekar on politics during corona pandemic news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN